डोळ्यांच्या आरोग्यासाठी टिप्स
आज आपण डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण अवयव म्हणजे डोळे. डोळ्यांची काळजी घेणे हे सर्वांसाठी खूप आवश्यक आहे. डोळे असतील तर आपण हे सुंदर जग पाहू शकू. त्यामुळे त्यांची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे डोळ्याची काळजी कोणत्या पद्धतीने घ्यावी या बाबतीत काही टिप्स खालील प्रमाणे आहेत त्या टिप्स आपण फॉलो करून आपल्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
“डोळ्यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांना ताण किंवा थकवा येतो,” जागतिक ग्लोबलायझेशन मुळे आपणास वर्क फ्रॉम होम म्हणजेच ऑनलाईन कामे भरपूर प्रमाणात करावी लागत आहेत, त्यामुळे वारंवार आपणास स्क्रीन समोर थांबावे लागत आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालेले आपणास दिसत आहे.
कोरड्या डोळ्यांचे आजार दूर ठेवतील या टिप्स!
थकलेल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी टिप्स खालील प्रमाणे आहेत.
१. आहार आणि पूरक आहाराकडे लक्ष द्या.
निरोगी डोळ्यांसाठी, विशेषतः लहान मुलांसाठी फळे आणि भाज्यांनी समृद्ध असलेला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. कोरड्या डोळ्यांचा आजार काही विशिष्ट कमतरता (व्हिटॅमिन डी) आणि थायरॉईड रूग्णांमध्ये अधिक सामान्यपणे दिसून येतो. उन्हाळ्यात भरपूर द्रवपदार्थ प्यायल्याने डोळे ओले आणि निरोगी राहतात.
२. व्यायाम
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी विशेष असा व्यायाम नाही. पण धावणे, चालणे, सायकल चालवणे, योगासने इत्यादी करून शरीर निरोगी ठेवल्याने डोळ्यांचे रक्ताभिसरण आणि आरोग्य सुधारते, त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात.
३. डोळे चोळणे टाळा
३ नंबरची डोळ्यांच्या आरोग्यासाठी टिप्स आहे विनाकारण डोळे न चोळणे. तसेच, त्यांना हातांनी स्पर्श करू नका. स्पर्श करण्यापूर्वी नेहमी आपले हात धुवा. घाणेरड्या हातांनी डोळे चोळल्याने तुमच्या डोळ्यांत संसर्ग आणि जीवाणू येऊ शकतात. तुमचे डोळे कोरडे असल्यास, खाज येणे सामान्य असू शकते परंतु नेहमी डोळे चोळणे टाळावे.
४. डोळ्यांची तपासणी
तुम्हाला वारंवार डोकेदुखी, डोळे लाल होणे, जळजळ होणे किंवा दृष्टी अंधुक होत असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत: औषधोपचार न करणे चांगले असते.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्या. कोरड्या डोळ्यांचा आजार गंभीर समस्या होण्यापूर्वी प्रतिबंध करणे आणि त्यावर उपचार करणे नेहमीच चांगले आहे. ही महत्वपूर्ण डोळ्यांच्या आरोग्यासाठी टिप्स आहे.
५. ब्रेक घ्या
लॅपटॉप तसेच कॉम्प्युटर वर काम करत असताना मधेच सलग काम करू नये. मध्ये थोडा थोडा ब्रेक घ्यावा. 20:20:20 नियमाचे पालन करावे . दर 20 मिनिटांनी, 20-सेकंद ब्रेक घ्या आणि 20 मीटर दूर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे पहा, उदाहरणार्थ, बाहेरील झाड किंवा खोलीच्या पलीकडे असलेले घड्याळ. दुसरे काही नसल्यास, स्क्रीनपासून दूर पहा. ही महत्वपूर्ण डोळ्यांच्या आरोग्यासाठी टिप्स आहे.
६. प्रकाश व्यवस्थापन
प्रखर प्रकाश रेटिनल पेशींच्या समस्या निर्माण करू शकतो, ज्यामुळे डोळ्यांभोवती वेदना आणि सूज येऊ शकते. स्क्रीनची साईज जितकी लहान असेल तेवढा अधिक जास्त ताण तुमच्या डोळ्यांवर येईल.
७. चष्म्याचा वापर करा
जर तुम्ही चष्मा वापरत असाल, तर नियमितपणे त्याचा वापर करणे आवश्यक आहे. चष्म्याचा नंबर वाढला आहे किंवा कमी झाला आहे हे नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. नियमितपणे चष्म्याचा वापर करून आपण डोळ्यांचे आरोग्य जपू शकतोत.
विशेषतः हे लहान मुलांसाठी. अँटी-ग्लेअर कॉम्प्युटर ग्लासेस अशा लोकांसाठी उपयुक्त आहेत ज्यांना ऑफिसच्या वेळेमुळे किंवा शाळा/कॉलेजच्या वर्गांमुळे बराच वेळ स्क्रीनसमोर राहावे लागते.
८. आहारात गाजर प्रमाण वाढवा.
८ क्रमांकाची डोळ्यांच्या आरोग्यासाठी टिप्स आहे आहारात गाजर सेवन करणे. गाजरांमध्ये व्हिटॅमिन ए, के, सी, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यासारखी सर्व शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. गाजरात एक मजबूत अँटिऑक्सिडेंट देखील भरपूर प्रमाणत आढळतो जो खूप फायदेशीर आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजरांचे आहारातील सेवन खूप महत्त्वपूर्ण आहे.
९. आय ड्रॉप्सचा योग्य प्रकारे वापर
डॉक्टरांनी डोळ्यात सोडण्यासाठी दिलेले आय ड्रॉप्स हे काही कालावधीनंतर कालबाह्य होतात, त्यामुळे ते योग्य प्रकारे वापर करणे गरजेचे असते. पूर्वी दिलेले आय ड्रॉप्स दुसऱ्यांदा आपणास डोळ्याचा त्रास होत असेल तेव्हा आपण ते वापरू नयेत. प्रत्येक वेळी नवीन आय ड्रॉप्स घेऊन त्याचाच वापर करावा.
१०. काकडीचा वापर
१० क्रमांकाची डोळ्यांच्या आरोग्यासाठी टिप्स आहे काकडीचा वापर. काकडीचे सेवन हे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काकडीत ९० टक्के पाण्याचे प्रमाण असते, जे शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवत असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, फायबर यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक फायदे देतात. काकडीचा काप करून तो डोळ्यावर ठेवल्याने डोळ्याची होणारी जळजळ थांबते व डोळ्यांना आराम मिळतो. त्यामुळे काकडीच्या आहारातील उपयोगाबरोबरच डोळ्यावर ठेवल्यानेही आपण डोळ्याच्या आरोग्य आपण जपू शकतोत.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी टिप्स बाबतीत काही प्रश्नोत्तरे
प्रश्न:- डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी साठी काय खावे?
उत्तर:- गाजर, बीट, रताळे.
प्रश्न:- डोळ्यातील सर्वोत्तम जीवनसत्व काय आहे?
उत्तर:-डोळ्यातील सर्वोत्तम जीवनसत्व व्हिटॅमिन ए आहे?
प्रश्न:-अंडी तुमच्या डोळ्यांसाठी वाईट आहेत का?
उत्तर:-डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंडी हा एक उत्तम आहार आहे .
प्रश्न:-कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे दृष्टी कमी होते?
उत्तर:-अ जीवनसत्वाची कमतरता असेल तर दृष्टी कमी होते.
प्रश्न:-कोणत्या अन्नात सर्वात जास्त व्हिटॅमिन ए आहे?
उत्तर:-यकृत, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन एचे प्रमाण सर्वाधिक असते.
प्रश्न:-डोळे आलेले किती दिवस राहतात?
उत्तर:-डोळे आलेले ३-४ दिवस राहतात.
प्रश्न:-मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर डोळा बरा होण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर:- मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर डोळा बरा होण्यासाठी सुमारे 8 आठवडे वेळ लागतो.
सारांश
डोळा हा मानवी शरीराचा सर्वात महत्त्वपूर्ण अवयव आहे. त्याच्या आरोग्यासाठी वरील टिप्स फॉलो केल्या तर आपल्या डोळ्याचे आरोग्य सुधारेल.