आपत्कालीन निधी काय आहे? या निधीसाठी पैसे कसे वाचवावे? 4 Important पर्याय!

आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड)

आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मेडिकल इमर्जन्सी किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव आपल्याला पैशांची आवश्यकता असते, परंतू त्या क्षणी आपल्याकडे पैसे असतीलच असे नसते, तसेच आपले नातेवाईक किंवा मित्र मंडळी, हे देखील आपल्याला मदद करतीलच या गोष्टीची काहीच खात्री नसते. अशा वेळी आपल्यावर आलेले संकट, आपली पैशांची अडचण आणि खूप सारे टेन्शन यामुळे आपण नक्की काय करायला पाहिजे, हे सूचत नाही. पण ह्यावर सर्वोत्तम असा एकच उपाय आहे, तो म्हणजे आपत्कालीन निधी. जो आपल्याला अडचणीच्या वेळी खूप फायदेशीर ठरू शकतो. आणि आजच्या ह्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला आपत्कालीन निधी बद्दल माहिती तसेच फंड जमा करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणार आहोत.

आपत्कालीन निधी म्हणजे काय?

अडचणीच्या काळात वापरता येऊ शकणारा निधी म्हणजे आपत्कालीन निधी“. एक अशी पैशांची साठवण किंवा रक्कम जी आपल्या वैयक्तिक आर्थिक अडचणींमध्ये आपला आधार बनू शकते. समजा, तुम्ही तुमची नोकरी गमावून बसला आहात, अशा वेळी नवीन नोकरी मिळेपर्यंत तुमची पैशांची गरज तुमचा आपत्कालीन निधी भागवू शकतो.

आपत्कालीन निधी म्हणून अंदाजे किती निधी साठवावा?

खरं सांगता असे काहीही निश्चित करणे कठीण आहे की आपण किती पैसे दर महा आपल्या खर्चातून बाजूला आपत्कालीन निधी साठी साठवायला हवेत. आणि त्यापेक्षा ही जास्त महत्वाचं आहे की, ही रक्कम मुळात तुमच्या महिन्याच्या खर्चावर आणि पगारावर अवलंबून आहे. असे गृहीत धरायला हरकत नाही की, जर तुमचा पगार वीस हजार रुपये इतका आहे, आणि तुमचा दरमहा खर्च हा 10,000 रुपये इतकाच आहे, तर दरमहा 5,000 रुपये तुम्ही फंड साठी नक्कीच साठवू शकता. तसेच कोणत्याही अडचणीच्या काळात 8 ते 12 महिने तरी हा निधी आपल्याला उपयोगी पडेल ह्या अंदाजाने बचत करावी.

आपत्कालीन निधी चे फायदे

अनावश्यक कर्ज घेण्यापासून बचाव होतो.

बऱ्याचदा असे होते की, एखादं संकट अचानक आपल्यावर ओढवलं जातं. उदा. एखादी वैद्यकीय अडचण, अपघात, घरातील अत्यंत आवश्यक अशा वस्तूंच बिघडणं ज्यासाठी आपल्याला तातडीने पैशांची गरज असते आणि आपली अडचण लक्षात घेता पैसे उभे कसे करायचे ह्यावरच आपलं सगळं लक्ष केंद्रित होतं आणि सापडेल त्या मार्गाने आपण पैसे जमा करतो. त्यातच सर्व प्रथम निवडला जाणारा मार्ग म्हणजे कर्ज घेणे आणि एकदा कर्ज घेतलं कि त्याच्या आवश्यकतेपेक्षा जास्त असलेल्या व्याज दराला आपण बळी पडतो. पण जर आपल्याकडे आपत्कालीन निधी म्हणून आधीच काही निधी बचत केलेला असेल तर तो आपल्याला लोन घेण्यापासून वाचवतो.

मानसिक तणावापासून सुटका होते.

कोणतेही आर्थिक संकट आपल्यावर ओढवल्यानांतर टेन्शन किंवा स्ट्रेस येणं अगदी साहजिकच आहे. आपण आपली समस्या कशी सोडवणार आणि आवश्यक असलेले पैसे कसे जमा करणार या चिंतेनेचं आपण मानसिक तणावाखाली येतो. सोबतच आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य ही बिघडू लागते. पण अशा संकटात जर पूर्वीच आपत्कालीन निधीचे नियोजन केलेले असेल तर निर्धास्तपणे आपण आपल्या संकटांना समोरे जाऊ शकतो.

बचत करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

आपत्कालीन निधी म्हणून जेव्हा आपण दर महा विशिष्ट रक्कम वाचवू लागतो, तेव्हा थोड्या अवधीतच ती एक चांगली सवय बनते आणि आपले अनावश्यक खर्च कसे टाळता येतील ह्यावर आपण आपले लक्ष केंद्रित करतो. ज्याचा परिणाम म्हणून आपण जास्त बचत करायला शिकतो आणि आपल्या अडचणीत हिच बचत आपल्याला उपयुक्त ठरते.

आपत्कालीन निधी साठी पैसे कुठे किंवा कसे बचत करावे?

१.बचत खाते

साधारणपणे आपल्या सर्वांकडेच बँकेत एक सेविंग अकॉउंट म्हणजे बचत खाते हे असतेच. ह्या खात्याचा उपयोग हा पैसे बचत करून साठवण्यासाठीच केला जातो त्यामुळे दरमहा तुम्ही तुम्हाला जी रक्कम साठवायची आहे, ती ह्या खात्यामध्ये जमा करू शकता. बँकेद्वारे ऑटो स्वीप हा ही एक पर्याय दिला जातो, ज्याचा उपयोग करता सेविंग्स अकॉउंट मध्ये असलेल्या रकमेवर तुम्हाला फिक्सड डिपॉजिट इतकाच व्याज मिळतो.

२.फिक्स्ड डिपॉजिट (FD)

फिक्स्ड डिपॉजिट मध्ये तुम्ही एक निश्चित रक्कम जमा करू शकता आणि त्यावर मिळणारा व्याज ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. फिक्सड डिपॉजिट तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा सुरु करू शकता आणि तुम्हाला गरज असल्यास केव्हाही  बंद ही करू शकता. जेव्हा फिक्सड डिपॉजिट बंद केला जातो त्यावेळी जमाकर्त्याच्या खात्यामध्ये रक्कम व त्या तारखेपर्यंत जमलेला व्याज ही जमा केला जातो. प्रत्येक बँकेची फिक्सड डिपॉजिट सुरु करण्यासाठी आवश्यक असेलेली कमीत कमी रक्कम आणि व्याज दर हा वेगळा असतो, ज्याचे योग्य मार्गदर्शन फिक्सड डिपॉजिट सुरु करण्यापूर्वी बँके द्वारे किंवा वित्तीय संस्थेद्वारे तुम्हाला दिले जाते.

३.म्युच्युअल फंड

mutual fund

म्युच्युअल फंड: कमी जोखमीसह चांगल्या नफ्यासाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम गुंतवणूकीचा पर्याय आहे. सध्या बाजारात गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांपैकी फक्त म्युच्युअल फंडच चांगला आणि खात्रीशीर रिटर्न देत आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या माध्यमातून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. कारण ज्यांना शेयर बाजाराचे कमी ज्ञान आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित पर्याय आहे. कोणत्याही अडचणी मध्ये तुम्हाला पैशांची आवश्यकता असल्यास तुम्ही म्युच्युअल फंड बंद करू शकता आणि तुम्ही जमा केलेली रक्कम आणि त्यावरचा व्याज हा तुमच्या खात्यात जमा होतो.

४.रिक्योरिंग डिपॉजिट (RD)

म्युच्युअल फंडरिक्योरिंग डिपॉजिट हा बचत करण्यासाठी सर्वोत्तम असा पर्याय आहे. रिक्योरिंग डिपॉजिट सुरु करण्यासाठी तुम्ही तुमचं कोणत्याही प्रकारचे खाते असलेल्या बँकेत जाऊन एक फॉर्म भरू शकता, ज्याची आवश्यक माहिती बँकेच्या प्रतिनिधीं मार्फत तुम्हाला मिळते. फॉर्म भरताना दर महा जमा होण्यासाठी तुम्हांला एक रक्कम निश्चित करावी लागते जसे की, १ हजार रुपये, ३ हजार रुपये इत्यादी. दरमहा एका निश्चित तारखेला तुमच्या बँक खात्यातून हे पैसे वजा केले जातात.

सर्वांत महत्वाचे म्हणजे कोणत्याही अडचणी मध्ये तुम्हाला पैशांची आवश्यकता असल्यास तुम्ही ही डिपॉजिट बंद करू शकता आणि तुम्ही जमा केलेली रक्कम आणि त्यावरचा व्याज हा तुमच्या खात्यात जमा होतो आणि ह्यासाठी तुम्हाला बँकेत ही जाण्याची आवश्यकता नसते, बँकेच्या मोबाईल अँप वरून सुद्धा तुम्ही ही डिपॉजिट बंद करू शकता. तसेच, तातडीने तुमचे सगळे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

या बाबतीत काही महत्वाची प्रश्नोत्तरे 

प्रश्न:- माझ्याकडे किती मोठा आपत्कालीन निधी असावा?

उत्तर:- अडचणीच्या काळात 8 ते 12 महिने तरी हा निधी आपल्याला उपयोगी पडेल ह्या अंदाजाने निधी असावा.

प्रश्न:-कोणत्या फंडात सर्वाधिक धोका आहे?

उत्तर:- इक्विटी फंड सर्वसाधारणपणे सर्वाधिक जोखमीची योजना मानली जाते.

प्रश्न:- आपण ३ वर्षांसाठी SIP करू शकतो का?

उत्तर:- होय,आपण ३ वर्षांसाठी SIP करू शकतो.

प्रश्न:-कोणती गुंतवणूक सुरक्षित आहे?

उत्तर:-गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस एफडी, पीपीएफ आणि सरकारी बँकांमधील बचत खाते.

प्रश्न:-म्युच्युअल फंडाचे पैसे मिळण्यासाठी किती दिवस लागतात?

उत्तर:- तीन दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पैसे येतात

प्रश्न:-बचत खात्यात मला रु. 1 लाखासाठी किती व्याज मिळेल?.

उत्तर:- हे बँकेच्या व्याजदरावर अवलंबून असते.

आपण ही माहिती वाचायला हवी 

समारोप 

आजच्या काळात आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड) हा एक अत्यावश्यक निधी झाला आहे. जो आपण आपत्कालीन परिस्थिती ला सामोरे जाण्यासाठी नियमित पणे बाजूला काढून ठेवला पाहिजे. ही एक रक्कम आहे जी तुम्ही संकटाच्या वेळी किंवा अनपेक्षित आणि अनियोजित परिस्थितींसाठी वापरू शकतात, त्यामुळे, तुम्हाला लागू  शकणार्‍या अनपेक्षित आर्थिक कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तो फायदेशीर असेल. मला आशा आहे की, वरील माहितीचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल.