लेक लाडकी योजना 2023 Best Marathi

लेक लाडकी योजना

महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पात मुलींसाठी जाहीर केलेल्या महत्वपूर्ण योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. लेक लाडकी योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्वाची योजना आहे.

मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, मुलींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी, बालविवाह रोखण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठी राज्यात मुलींच्या सक्षमीकरण सादर योजना सुरू करण्यात आली आहे. ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत मुलींना १८वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये निधी दिला जाणार.

लेक लाडकी योजना

योजना कधीपासून लागू झाली आहे?

 • १ एप्रिल २०२३ व त्या नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या मुलीना हि योजना लागू झाली आहे.

लेक लाडकी योजना किती मुलींना लागू आहे?

 • जास्तीत जास्त २ मुलींना सदर योजना लागू आहे.
 • एखाद्या दाम्पत्यास १ मुलगा व १ मुलगी झाली असल्यास फक्त मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

लेक लाडकी योजनेसाठी उत्पन्न मर्यादा 

लेक लाडकी योजनेसाठी उत्पन्न मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.  सदर योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये १ लाख पेक्षा अधिक नसावे.

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजनेसाठी कोणती जुनी योजना अधिक्रमित करण्यात आली आहे?

“माझी कन्या भाग्यश्री” हि पूर्वीची योजना अधिक्रमित करण्यात आल्या नंतर लेक लाडकी योजना लागू करण्यात आली आहे.

लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेचे उद्दिष्टे सांगितले आहेत, त्या म्हणाल्या कि खालील बाबीसाठी प्रयत्न केले जातील. राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी हि  योजना सुरू करण्यात येणार आहे.  credit facebook

 • राज्यात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
 • मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
 • मुलींचा मृत्यूदर कमी करणे.
 • बालविवाह रोखणे.
 • कुपोषण कमी करणे.

लेक लाडकी योजनेचा लाभ कसा मिळणार?

 • मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावाने ३०००/-
 • मुलगी शाळेत गेली कि ३०००/-
 • मुलगी पाचवीत गेली कि ६०००/-
 • मुलगी अकरावीत गेली कि ७०००/-
 • आणि मुलगी 18 वर्षांची झाली कि ७५०००/-
 • मुलगी अठरा वर्षाची होई पर्यंत महाराष्ट्र शासन पात्र मुलीला एकूण लाख एक हजार रुपये देणार आहे.

हि माहिती आपण वाचली का?

या योजनेमुळे होणारे फायदे

 • पालकांच्या डोक्यावरील मुलींचा शिक्षणाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.
 • मुलीच्या पालन पोषणाचा भार यामुळे कमी होणार आहे.
 • मुलींचा मृत्यूदर या योजनेमुळे निश्चितच कमी होईल.
 • मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीनं योजना चांगली आहे.
 • महिला सक्षमीकरण होण्यास याचा फायदा होईल.

लेक लाडकी योजना शासन निर्णय साठी  क्लिक करा 

सदर योजनेची पात्रता

लेक लाडकी योजनेसाठी काय आवश्यक आहे ? कोणती पात्रता आवश्यक आहे या बाबतची माहिती खालील प्रमाणे.

 • सदर योजनेसाठी मुलगी मूळची महाराष्ट्र राज्यातील असावी.
 • पिवळ्या किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील.
 • वार्षिक उत्पन्न १ लाख च्या आत असावे.
 • या योजनेसाठी लाभार्थ्याकडे कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसायाला हवे.
 • लाभार्थी कोणत्याही सरकारी कार्यालयात नोकरीस नसावा.
 • दुसऱ्या आपत्यांनंतर आई किंवा वडील दोघांपैकी एकाची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झालेली असणे आवश्यक आहे.

लेक लाडकी योजना फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा. डाऊनलोड

या योजने साठी आवश्यक कागदपत्रे

 • मुलीचे आधार कार्ड
 • लाभार्थी कुटुंबाचे रेशन कार्ड
 • लाभार्थी  रहिवाशी दाखला
 • बँक खाते मुलीचे किंवा आई वडिलांचे
 • लाभार्थी मोबाईल नंबर
 • लाभार्थी  ई-मेल आयडी
 • पासपोर्ट साईजचे फोटो
 • मुलीचा जन्माचा दाखला

लेक लाडकी योजना

या योजने संदर्भात काही महत्वाची प्रश्नोत्तरे 

प्रश्न:-लेक लाडकी योजना लागू दिनांक काय आहे?

उत्तर:- लेक लाडकी योजना लागू दिनांक काय आहे १ एप्रिल २०२३.

प्रश्न:- या योजने पूर्वी कोणती योजना होती?

उत्तर:- या लेक लाडकी योजना पूर्वी “माझी कन्या भाग्यश्री’ हि योजना होती.

प्रश्न:- या लेक लाडकी योजना कोणासाठी आहे?

उत्तर:- हि योजना आर्थीक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबियासाठी आहे.

प्रश्न:- लेक लाडकी योजना रेशन कार्ड धरकासाठी आहे ?

उत्तर:- लेक लाडकी योजना पिवळ्या व केशरी रंगाच्या रेशन कार्ड धरकासाठी आहे.

प्रश्नोत्तरे 

प्रश्न:- हि योजना कोणत्या राज्यासाठी आहे ?

उत्तर:- लेक लाडकी योजना महाराष्ट या राज्यासाठी आहे.

प्रश्न:- लेक लाडकी योजना ची अधिकृत वेबसाइट कोणती आहे ?

उत्तर:- लेक लाडकी योजना ची अधिकृत वेबसाइट अद्याप उपलब्ध नाही.

प्रश्न:- लेक लाडकी योजनेचा टोल फ्री नंबर कोणता आहे?

उत्तर:- लेक लाडकी योजनेचा टोल फ्री नंबर अजून आलेला  नाही.

प्रश्न:- लेक लाडकी योजनेचा मुळ उद्देश कोणता आहे?

उत्तर:- लेक लाडकी योजनेचा मुळ उद्देश महिला सक्षमीकरण आहे.

सारांश

महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलीच्या विकासाला चालना देण्यासाठी लेक लाडकी योजना खूप महत्वाची योजना ठरू शकते. सदर योजनेचा आदर्श देशातील इतर राज्य हि घेतील आणि भारत देशातील महिलांच्या विकासाला चालना मिळेल.

या योजने संदर्भात मा. नामदार आदिती ताई तटकरे यांनी instagram या सोशल मिडिया वर शेयर केलेली पोस्ट

credit instagram