आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर | आधार कार्ड ला मोबाईल नंबर कसा अपडेट करावा ? – सर्वोत्तम मार्ग

आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर

आधार कार्ड हे भारतातील सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्ड आहे. अनेक सरकारी आणि इतर गोष्टींमध्ये आधारची गरज असते. आज अनेक सेवा ऑनलाइन झाल्या आहेत, आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर OTP जाण्यासाठी आधार कार्ड  बरोबर मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर नसेल तर

तुमच्याकडे उपलब्ध असलेला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक अडचणी बरोबर सामना करावा लागेल, जर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर निष्क्रिय केला असेल तर तुम्ही अनेक प्रकारच्या आधार सेवांचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यासाठी तूमच्याकडे आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर या याबद्दल माहिती देणार आहोत.

जर तुमचा आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर निष्क्रिय झाला असेल किंवा तुमच्याकडे जुना लिंक केलेला मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर UIDAI डेटाबेसमध्ये अपडेट करू शकतात . प्रथम  तुम्हाला आधार सेवाकेंद्र तुमच्या जवळ कोणते आहे त्या ठिकाणी जावे लागेल. आधार कार्डमधील फोन नंबर बदलण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

PhonePe वरून बँक स्टेटमेंट कसे काढायचे अधिक माहितीसाठी क्लिक करा

आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर करण्यासठी या स्टेप्स वापरा

प्रथम  तुम्हाला आधार सेवाकेंद्र तुमच्या जवळ कोणते आहे त्या ठिकाणी जावे लागेल.

आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर

त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर बदल करायचा आहे, म्हणजेच आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर करायचा आहे, ही माहिती तुम्हाला प्रथम सांगावी लागेल.

आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर

 त्यानंतर तुम्हाला आधार सेवा केंद्र या ठिकाणी एक नवीन फॉर्म दिला जाईल. जो कि आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर चा असेल.

आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर

आधार सेवा केंद्रावर तुम्हास जे कागदपत्रे मागितले आहेत ते सर्व कागदपत्रे या फॉर्म सोबत जोडून द्यावे लागतील. त्यानंतर आधार सेवा केंद्रावर त्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर

कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर आधार केंद्रावरील केंद्र संचालक ती सर्व माहिती आधारच्या डाटाबेस मध्ये online अपडेट करतील.

आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर

त्यानंतर सुमारे सात दिवसानंतर तुम्हाला तुमच्या अपडेट केलेल्या मोबाईल क्रमांकावर आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर चा मेसेज येईल. जो वरील प्रमाणे असेल.

आधार फोन अपडेट करत असताना आपण इतर कोणकोणत्या बाबी अपडेट करू शकतो

  • बायोमेट्रिक्स
  • फिंगरप्रिंट,
  • डोळे छायाचित्र
  • तुमचा लेटेस्ट फोटो
  • पत्ता
  • नावात बदल असेल तर

आधार फोन अपडेट बद्दल काही प्रश्नोत्तरे

प्रश्न:- आधार कार्डमध्ये फोन नंबर लिंक आहे का कसा तपासायचा?

उत्तर:- आधार कार्डमधील मोबाईल क्रमांक पाहण्यासाठी सर्वप्रथम uidai.gov.in ही आधार ची  वेबसाइट ओपन करा. यानंतर Verify an Aadhaar Number हा पर्याय निवडा. यानंतर, पुढील पेजवर तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून पडताळणी करा. त्यानंतर तुमच्या आधार कार्डची सर्व माहिती तुम्हाला याठिकाणी स्पष्टपणे दिसेल.

प्रश्न:- आधार कार्डमध्ये मोबाईल क्रमांक बदलण्याचा जलद मार्ग कोणता आहे?

उत्तर:- तुम्ही कायमस्वरूपी आधार सेवा केंद्राला भेट देऊन तुमचा मोबाईल नंबर जलद अपडेट करू शकता.

प्रश्न:- आधार कार्ड अपडेट करण्यसाठी 2023 साठी किती शुल्क आहे?

उत्तर:- आधार कार्ड अपडेट करण्यसाठी 2023 साठी पन्नास रुपये इतके शुल्क आहे.

प्रश्न:- आधारमध्ये कोणतीही व्यक्ती आपले नाव किती वेळा बदलू शकते.?

उत्तर:- आधारमध्ये कोणतीही व्यक्ती आपले नाव फक्त दोन वेळा बदलू शकते.

प्रश्न:- आधारमध्ये कोणतीही व्यक्ती जन्मतारीख किती वेळा बदलू शकते.?

उत्तर:- आधारमध्ये तुम्ही जन्मतारीख एकदाच बदलू शकतात.

 सारांश

जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला गॅस सबसिडी सहज मिळेल. यामध्ये कोणतीही वेगळी कागदपत्रे जोडावी लागणार नाहीत. आधार कार्डद्वारे तुम्हाला फक्त 10 दिवसांत पासपोर्ट मिळू शकतो. हि  प्रक्रियेत पोलिस पडताळणी नंतर होते.  आधार कार्ड देऊनच तुम्ही बँक खाते उघडू शकता. इतर कोणतेही दस्तऐवज प्रदान करणे आवश्यक नाही.  तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही डिजिटल लॉकर वापरू शकता. त्यात तुम्ही तुमचे सर्व खाजगी कागदपत्रे साठवू शकता. डिजिटल लॉकर चा वापर करण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर लिक असणे आवश्यक आहे.

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केल्यास सरकारला बनावट मतदार ओळखणे सोपे होईल. जन धन योजनेत तुमची कामे फक्त आधारद्वारेच होतील. इतर कोणतेही कागदपत्र सादर करावे लागणार नाहीत.  तुम्हाला पेन्शन मिळत असेल तर तुमचा आधार क्रमांक तुमच्या विभागात नोंदवा. यामुळे तुम्हाला मासिक पेन्शन सहज मिळेल. वरील सर्व बाबीसाठी आपले आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर लिक असणे आवश्यक आहे.