PhonePe वरून बँक स्टेटमेंट कसे काढायचे? 3 महत्वाच्या स्टेप (Best Marathi)

PhonePe वरून बँक स्टेटमेंट कसे काढायचे थोडक्यात

देशातील होत असलेल्या  डिजिटल प्रगतीमुळे सध्यस्थितीत ऑनलाइन पैशांच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झालीआहे. UPI द्वारे  पैसे पाठवण्याच्या बाबतीत भारत आज जगात अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारतात UPI द्वारे दर महिन्याला 10 अब्जाहून अधिक व्यवहार होत आहेत. फोन पे ने आता एक नवीन अपडेट आणले आहे. ज्याद्वारे तुम्ही  PhonePe वरून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करू शकणार आहात. त्याबाबत ची सखोल माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

फोन पे कसे चालू करावे?

तुम्ही PhonePe ॲपद्वारे सर्व काही करू शकता जे तुम्ही इतर मोबाइल पेमेंट ॲप्स जसे की मनी ट्रान्सफर, स्कॅन पेमेंट, मोबाइल रिचार्ज, DTH रिचार्ज, डेटाकार्ड रिचार्ज, गॅस बिल, विमा बिल आणि PhonePe वरून इलेक्ट्रिक बिल पेमेंट करू शकता. तसेच PhonePe वरून बँक स्टेटमेंट ही मिळवणे आता सोपे झाले आहे. फोनवर ते कसे चालू करायचे ते आपण पाहूया.

फोन पे काय आहे?

PhonePe हे भारतीय ऑनलाइन मोबाइल पेमेंट ॲप आहे. ऑनलाइन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टने हे ॲप तयार केले आहे. फोन पे हे एक पेमेंट ॲप आहे जे UPI वापरते, या ॲपमध्ये वॉलेट सेवा देखील उपलब्ध आहे. म्हणजेच, हे बँक-टू-बँक आणि वॉलेट-टू-बँक अशा दोन्ही प्रकारच्या पैसे पाठविण्याची सुविधा ग्राहकांना देते. फोन पे ॲप वर तुम्ही बिल भरले किंवा पैसे ट्रान्सफर केले तरीही ते वापरण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य आहे, हे ॲप तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेत नाही.

तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे कसे चालू करावे?

PhonePe ॲप डाउनलोड

  • प्रथम, तुम्हाला PhonePe ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करणे आवश्यक आहे.
  • तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वरून PhonePe चे ॲप download करू शकतात. फोनपे ॲप डाउनलोड लिंक
  • दिलेल्या लिंकवरून फोन पे ॲप डाउनलोड करा आणि इंस्टॉलेशन केल्या नंतर ते ॲप चालू करा.

PhonePe ॲप रजिस्ट्रेशन

  • तुम्हाला PhonePe ॲप लाँच करावे लागेल आणि आता नोंदणी करा पर्याय निवडावा लागेल.
  • आता तुम्हाला तुमच्या बँक बरोबर लिंक केलेला मोबाईल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती टाकून PhonePe वर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • येथे फक्त तुमच्या बँक खात्यात नोंदणीकृत मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.
  •  तुम्ही नंबर टाकल्यावर, तुमच्या फोन नंबर  वर एक OTP पाठवला येईल.
  • आणि तुमचा फोन नंबर चेक केला जाईल. टीप – तुमच्‍या बँकेशी जोडलेला नंबर आणि तुमच्‍या मोबाईल फोनमध्‍ये ओटीपीची पडताळणी करण्‍यासाठी तुम्‍ही तोच नंबर देणे आवश्‍यक आहे.
  • यानंतर तुमचे पूर्ण नाव भरा.
  • येथे तुम्हाला चार अंकी पिन क्रमांक टाकावा लागेल.
  • तुम्ही कोणताही पिन टाकू शकता, फोन पे वापरताना हा पिन आवश्यक असेल.
  • आता तुम्हाला तुमचे बँकचे Account PhonePe च्या ॲप बरोबर जोडावे लागेल.
  • बँक खाते जोडण्यासाठी Connect Bank Account वर क्लिक करा.
  • तुमच्या फोनमध्ये एकच सिम असल्यास SEND SMS वर क्लिक करा.
  • तुमच्याफोन मध्ये एकापेक्षा जास्त सिम असल्यास तुमचे बँकेत जोडलेले सिम निवडा आणि नंतर Send SMS वर क्लिक करा.
  • तुम्ही SMS पाठवा वर क्लिक करता तेव्हा तुमच्या फोनवरून एक एसएमएस पाठवला जाईल.
  • यासाठी तुमच्या सिममध्ये बॅलन्स असला पाहिजे जेणेकरून मेसेज पाठवता येईल.

PhonePe ॲप UPI आयडी

  • मोबाईल नंबर कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला UPI आयडी बनवावा लागेल.
  • तुमचा मोबाईल नंबर आपोआप येथे दिसेल, तुम्ही UPI आयडी साठी मोबाईल क्रमानक किंवा तुमचे नाव निवडू शकतात. परंतु या पूर्वी तो UPI आयडी कोणीही वापरलेला नसावा.
  • आता तुम्हाला बँकेचे नाव निवडावे लागेल. तुमचा मोबाईल नंबर ज्या बँकेत नोंदणीकृत आहे ती बँक निवडा.
  • तुमचा फोन नंबर एकापेक्षा जास्त बँकांमध्ये नोंदणीकृत असल्यास, तुम्हाला तुमच्या फोनशी लिंक करायचे खाते निवडा.
  • आता तुम्हाला UPI पिन बनवावा लागेल. व्यवहार पूर्ण करताना तुम्हाला हा उपयोगी असेल.
  • UPI पिन सेट करण्यासाठी, UPI पिन सेट करा वर क्लिक करा,UPI पिन तयार करण्यापूर्वी तुमचा ATM/डेबिट कार्ड वरील योग्य ती माहिती भरा.
  • जर तुम्ही याआधी UPI पिन सेट केला असेल तर I have already UPI पिन पर्याय निवडा.
  • आता तुम्ही फोन पे च्या मदतीने सर्व ऑनलाइन पेमेंट च्या बाबतीतील व्यवहार पूर्ण करू शकतात.

आपण ही माहिती वाचली का?

PhonePe वरून बँक स्टेटमेंट कसे काढायचे?

PhonePe वरून बँक स्टेटमेंट काढणे देखील आता शक्य आहे. जर तुम्हाला PhonePe वरून बँक स्टेटमेंट काढण्यात अडचण येत असेल तर या पोस्ट द्वारे आपण PhonePe वरून बँक स्टेटमेंट टप्प्याटप्प्याने कसे काढायचे ते पाहूयात. PhonePe ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची (RBI) नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीज (NBFC) परवाना मिळाल्यानंतर अकाउंट एग्रीगेटर (AA) सेवा सुरू केली आहे. ग्राहक आणि वित्तीय संस्था यांच्यात आर्थिक डेटाचे सुरक्षित आणि सुलभ शेअरिंग प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

अकाउंट एग्रीगेटर सेवा ग्राहकांना त्यांचा आर्थिक डेटा जसे की बँक स्टेटमेंट, विमा पॉलिसी आणि इतर, कर्ज, नवीन विमा आणि इतर बँकिंग सेवांसारख्या सेवांसाठी सामायिक करण्यात मदत करेल. ग्राहक PhonePe app वरून कोणत्याही चालू आर्थिक सेवांची विनंती करू शकतात,किंवा आर्थिक सेवांची विनंती रद्द करू शकतात.

१. फोन पे ॲप ओपन करा

ही PhonePe वरून बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठीची ही पाहीली पायरी आहे .

  • लॉग इन केल्यानंतर तुम्ही ॲप च्या होम पेजवर पोहचाल.
  • ॲप च्या होम पेजवर तुम्हाला चेक बॅलन्सचा पर्याय दिसेल.

PhonePe वरून बँक स्टेटमेंट

  • स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करू शकता.
  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला बँक स्टेटमेंट लिहिलेले दिसेल.

२.बँक स्टेटमेंटवर क्लिक करा

  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • ज्यामध्ये तुम्हाला बँक स्टेटमेंट दिसेल.

PhonePe वरून बँक स्टेटमेंट

  • तुम्हाला बँक स्टेटमेंटच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर पुन्हा एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये बँक निवडण्याचा पर्याय दिसेल.

३.तुमची बँक निवडा

  • ज्या बँकेत तुमचे खाते आहे ती बँक या ठिकाणी  तुम्हाला निवडावी लागेल.
  • बँक निवडल्यानंतर, तुम्हाला एका नवीन पेजवर नेले जाईल.
  • या नंतर तुम्हाला view statement वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर add bank account वर क्लिक करून एक वेळेस ची बँक add करण्याची प्रोसेस पूर्ण करावी लागेल.
  • जिथे तुमची बँक माहिती असेल. यानंतर तुम्हाला त्या statement वर क्लिक करावे लागेल आणि अशा पद्धतीने  तुम्ही PhonePe वरून बँक स्टेटमेंट पाहू शकतात.

टीप सद्यस्थितीत फक्त काही बँकाच स्टेटमेंट उपलब्ध करून देत आहेत. लवकरच आता सर्व बँका PhonePe वरून बँक स्टेटमेंट साठी माहिती मिळवून देतील.

PhonePe वरून बँक स्टेटमेंट काढण्याशी संबंधित काही प्रश्नोत्तरे

प्रश्न:-PhonePe ची दररोजची कमाल मर्यादा किती आहे?

उत्तर:- दररोज PhonePe वर व्यवहार मर्यादा रु. १ लाख . शिवाय, तुम्ही PhonePe द्वारे दररोज 20 व्यवहार करू शकता.

प्रश्न:- मी माझे बँक खाते मोबाईल बरोबर लिंक न करता PhonePe वापरू शकतो का?

उत्तर:- बँक खाते मोबाईल बरोबर लिंक असणे आवशयक आहे.

प्रश्न:-PhonePe वापरण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे का?

उत्तर:- होय, चालू स्थितीतील आणि वैध बँक खाते असल्याशिवाय PhonePe चा वापर आपण करू शकत नाही.

प्रश्न:- UPI द्वारे दररोज किती व्यवहार करता येतात?

उत्तर:- UPI द्वारे दररोज २० व्यवहार करता येतात.

प्रश्न:-UPI व्यवहारावर काही tax आहे का?

उत्तर:- UPI व्यवहार रु. पर्यंत. ५०,००० /- करमुक्त आहेत.

प्रश्न:-PhonePe ची मालकी कोणत्या देशाकडे आहे?

उत्तर:- PhonePe ची मालकी भारत या देशाकडे आहे.

प्रश्न:- PhonePe ला RBI ने मान्यता दिली आहे का?

उत्तर:-जानेवारी 2023 मध्ये, PhonePe ची उपकंपनी असलेल्या PhonePe टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून नियामक मंजूरी मिळवली.

प्रश्न:-UPI म्हणजे काय?

उत्तर:-Unified Payments Interface.

सारांश

PhonePe च्या  माध्यमातून, आपल्याला विवध प्रकारचे फायदे होत आहेत.  जसे कि पैसे पाठवणे. विवध बिल पेमेंट भरणे. फोन पे चा वापर आज भारतात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे बँक स्टेटमेंट साठी आता बँकेत जाण्याची आवश्यकता या नवीन अपडेट मुळे शक्य होणार आहे. अशाप्रकारे आज आपण या लेखात  PhonePe वरून बँक स्टेटमेंट कसे काढावे या बद्दल माहिती पहिली आहे.