अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जन्मदिनानिमित्त अवधूत वारगे व तनिष्का वारगे यांचा सहभाग
भारतरत्न पुरस्कार प्राप्त व मिसाईल मॅन डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हॉटेल स्टार पॅलेस रामेश्र्वरम, तामिळनाडू या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात अवधूत वारगे व तनिष्का वारगे यांनी सहभाग घेतला होता. रायगड जिल्ह्यातील हे दोघेही बालवैज्ञानिक असून त्यांना विज्ञान या विषयात आवड आहे.
अवधूत वारगे यांचा स्मार्ट वॉटर इरिगेशन प्रकल्प
देशभरातून नाविन्यपूर्ण ३० प्रकल्पांचा यात सहभाग होता. यामध्ये स्वप्नातील आदर्श शाळा साकारताना सोलर एनर्जी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्पर्धा परीक्षा, खेळांची मैदाने, वैज्ञानिक प्रयोगशाळा सोबतच रोबोटिक्सची प्रयोगशाळा असायला हवी. विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण शक्ती आहार योजना अंतर्गत उत्तम दर्जाचा आहार शाळेतच तयार करून मिळावा यासाठी स्वयंचलित पाणी पुरवठा मशीन रोबोटिक्स च्या सहाय्याने तयार केले आहे.
आर सी एफ ज्युनिअर कॉलेज १२ वीचा विद्यार्थी आहे अवधूत वारगे
रायगड जिल्ह्यातील आर सी एफ ज्युनिअर कॉलेज १२ वीचा विद्यार्थी अवधूत वारगे व विद्यार्थिनी तनिष्का वारगे ९ वी यांनी स्मार्ट वॉटर इरिगेशन हा प्रकल्प सादर केला आहे.
आपण मिसाईल मॅन डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांची माहिती वाचली का?
या प्रकल्पाचे अवलोकन
यांच्या प्रकल्पाचे अवलोकन डॉ. एस. सोमनाथ डायरेक्टर इस्रो (चांद्रयान 3चे यशस्वी उड्डाण टीमचे अध्यक्ष), डॉ.एस व्यंकटेश्वरा डेप्युटी डायरेक्टर इस्रो बंगलोर, डॉ.दिलीप देशमुख पुणे, व इतर मान्यवरांनी केले.
या प्रकल्पास यांचे लाभले मार्गदर्शन
या प्रकल्पास मार्गदर्शन श्री. संदीप दत्तात्रेय वारगे राज्य समन्वयक एके.आय.एफ. यांनी केले. तसेच प्रकल्पास माननीय प्राचार्या संविधा जाधव व विज्ञान शिक्षक यांचे प्रोत्साहन मिळाले.
विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
सदरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन श्री. ए. पी. जे एम. शेख सलीम (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नातू) यांनी स्थापन केलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते. संस्थेचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी, राज्य समन्वयक मनिषा ताई चौधरी यांच्यामुळे या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्याना अविस्मरणीय क्षण अनुभवता आले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन ची वेबसाईट https://www.apjabdulkalamfoundation.org/
मार्गदर्शक श्री. संदीप दत्तात्रेय वारगे यांच्या कार्याची नोंद
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणारे प्राथमिक शिक्षक संदीप वारगे यांच्या कार्याची नोंद रेकोर्ड बुक ऑफ लंडन यांनी घेतल्यामुळे विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याचा सर्व कोकणवासियांना अभिमान आहे. त्यांच्या या कार्यामुळे विविध स्तरातून कौतुकाचे वर्षाव होत आहेत. मार्गदर्शक श्री. संदीप दत्तात्रेय वारगे यांना २०२३ चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम् चे कोकण समन्वयक आहेत. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, महाराष्ट्र चे जिल्हा समन्वयक (प्राथमिक) असून रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटना चे जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा अलिबाग चे प्रधान सचिव आहेत.