75 लाख मोफत गॅस कनेक्शन PM Ujjwala Yojana बेस्ट मराठी

प्रधानमंत्री उज्वला योजना

सरकार 75 लाख मोफत गॅस कनेक्शन देणार आहे. PM Ujjwala Yojana ही योजना 1 मे 2016 रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा समाजावर क्रांतिकारक परिणाम झाला आहे . योजनेचा 2.0 नवीन पार्ट आलेला आहे. त्यानुसार योग्य लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.महिलांना लाकडाने स्वयंपाक करण्यापासून मुक्त करण्यात आले आणि पात्र लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले. आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

PM Ujjwala Yojana

या योजनेअंतर्गत सरकार 75 लाख नागरिकांना एलपीजी कनेक्शन देणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला उज्ज्वला योजनेची माहिती घ्यावी.पीएमपी उज्ज्वल योजनांची सुरुवात ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणे हा आहे.

अधिकृत वेबसाइट

अधिकृत वेबसाईट लिंक

यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर डाउनलोड फॉर्मचा पर्याय दिसेल ज्या ठिकाणाहून आपण तो फॉर्म डाउनलोड करू शकता.

Kyc फॉर्म डानलोड करण्यासाठी क्लिक करा

डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व बाबीचा आवश्यक तपशील भरावा लागेल.

तुम्हाला LPG  केंद्रावर जाऊन तुमच्या कागदपत्रांसह हा फॉर्म त्या ठिकाणी जमा करावा लागेल. एकदा तुमचा अर्ज पडताळल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत LPG कनेक्शन मिळेल.

प्रधानमंत्री उज्वला योजना (PM Ujjwala Yojana) फायदे

  • या योजनेचे अंतर्गत लाभार्थ्यांचे मोफत एलपीजी कनेक्शन मिळत होते.
  • लाभार्थी स्टोवची किंमत आणि पहिली रिफिल भरण्यासाठी ईएमआय सुविधा पर्याय निवडू शकतात.
  • लाभार्थी आपल्या बँक खात्यात सब्सिडी रक्कम  प्राप्त होण्यासाठी  बँक लिंक करू शकतात.

PM Ujjwala Yojana

योजनेसाठी आवश्यक पात्रता

  • प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी  (PM Ujjwala Yojana) 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला अर्ज करू शकतात.
  • पात्र होण्यासाठी या महिला बीपीएल या गटात असणे आवश्यक आहे.
  • बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
  • त्याच्याकडे बीपीएल कार्ड आहे याशिवाय शिधापत्रिकाही असावी.
  • भारतात, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 27 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो.
  • या महिलांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर LPG कनेक्शन नसावे.
  • अर्जदार हा बीपीएल कार्ड धारण करणारा ग्रामीण रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अनुदानाची रक्कम प्राप्त होण्यासाठी महिला अर्जदाराचे देशभरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कुटुंबाकडे आधीपासून घरात एलपीजी कनेक्शन नसावे.

प्रधानमंत्री उज्वला योजना आवश्यक कागदपत्रे

  • बीपीएल रेशन कार्ड
  • सरपंच /नगरपालिका अध्यक्ष यांनी अधिकृत केलेले बीपीएल प्रमाणपत्र
  • फोटो ओळखपत्र (आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र)
  • अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मूलभूत तपशील जसे नाव, संपर्क माहिती, जन धन/बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक इ.
  • आधार कार्ड,
  • बँकेच्या PASSBOOK ची प्रत
  • वय प्रमाणपत्र.

ही माहिती आपण वाचली का?

प्रधानमंत्री उज्वला योजना महत्वाचे प्रश्नोत्तरे

प्रश्न:- PM Ujjwala Yojana योजना कोठे सुरू झाली?
उत्तर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून ही योजना सुरू केली होती. ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जातात.

प्रश्न:-उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?

उत्तर:- दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ फक्त बीपीएल कार्डधारक महिलांनाच  मिळतो.

प्रश्न:-PM Ujjwala Yojana योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

उत्तर:- गरीब कुटुंबातील महिलांना डिपॉझिट फ्री एलपीजी कनेक्शन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न:-उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमत किती आहे?

उत्तर:- आता उज्ज्वला योजनेचा गॅस सिलेंडर 600 रुपयांना मिळणार आहे, मोदी मंत्रिमंडळाचा निर्णय ऑक्टो २०२३ मध्ये झाला आहे.

प्रश्न:-उज्ज्वला योजना कधी सुरू झाली?

उत्तर:- उज्ज्वला योजना 1 मे 2016 रोजी सुरू झाली.

प्रश्न:-एखादी व्यक्ती किती गॅस कनेक्शन घेऊ शकते?

उत्तर:- जर तुमच्या कुटुंबात पती, पत्नी आणि दोन अविवाहित मुल असतील तर तुम्हाला फक्त एक गॅस कनेक्शन मिळण्याचा अधिकार आहे. तरीही तुमच्याकडे २ किंवा अधिक गॅस कनेक्शन असल्यास ३१ मार्चपूर्वी दुसरे कनेक्शन सरेंडर करा. अन्यथा तुमचे दोन्ही कनेक्शन रद्द केले जाऊ शकतात.

प्रश्न:- उज्ज्वला योजना अजूनही उपलब्ध आहे का?

उत्तर:- पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 ते 2025-26 या आर्थिक वर्षात 75 लाख एलपीजी कनेक्शन   देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) च्या विस्ताराला मंजुरी दिली आहे.

प्रश्न:- उज्ज्वला योजनेत किती लाभार्थी आहेत?

उत्तर:- १ मार्च २०२३  पर्यंत देशात ९.५९  कोटी उज्ज्वला लाभार्थी होते.

प्रश्न:- उज्ज्वला योजनेत किती सिलेंडर लाभार्थी महिलांना मिळतात ?

उत्तर:- उज्ज्वला योजनेत १२ सिलेंडर लाभार्थी महिलांना मिळतात.