परीक्षा कालावधी मध्ये कोणता आहार असावा व कोणता नसावा? Best Marathi 2024

परीक्षा कालावधी आणि आहार

विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचा उपयोग विद्यार्थी परीक्षेमध्ये कशाप्रकारे वापर करतात यावर त्याचे त्या शैक्षणिक वर्षाचे यश अवलंबून असते. विद्यार्थी जर परीक्षेच्या कालावधीमध्ये आजारी पडला तर त्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचे काहीच मोल होत नाही,  म्हणून परीक्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थी निरोगी असणे फार गरजेचे आहे. परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थी निरोगी राहण्यासाठी आहार कसा असावा? त्याबद्दलची माहिती आपण या पोस्टद्वारे घेणार आहोत.

परीक्षा

आहार कसा असावा ?

ऊर्जा देणारा

या काळातही वेळच्यावेळी आहार घ्यावा. या कालावधीत देण्याचा आहार हा ऊर्जा देणारा, उत्साहवर्धक, स्मरणशक्ती जोपासणारा आणि मानसिक ताणतणाव कमी करणारा असावा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा

रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा असावा. ज्या आहारामुळे आजार होण्याची शक्यता असते असा नसावा. ज्या आहारामुळे जास्त झोप, कंटाळा किंवा गुंगी येईल असा नसावा.

मिनि मिल्स

विद्यार्थ्याला दोन वेळा भरपूर जेवण देण्याऐवजी तीन ते चार वेळा थोडे थोडे, थोडीशी भूक राखून द्यावे. यालाच मिनि मिल्स म्हणतात. थोड्या अंतराने खाल्ल्याने मेंदूला सतत ऊर्जा मिळत राहील. शरीरालाही ऊर्जा मिळेल. पोट रिकामे राहणार नाही. एकाचवेळी जास्त खाल्ल्याने येणारी सुस्ती येणार नाही.

पाणी

योग्य प्रमाणात पाणी द्यावे. शहाळ्याचे पाणी, फळांचा रस द्यावा, चहा, कॉफीचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे. पातळ पदार्थांमुळे विद्याथ्यांचा तरतरीतपणा वाढेल. अतिप्रमाणात जलपान केल्यास सारखी लघवीला होण्याचा धोका आहे. याचा विचार करून नियोजनबद्धरीत्या पातळ पदार्थ द्यावेत.

फळे

परीक्षा

परीक्षाकाळात एकाच जागी बसून अभ्यास करण्यावर सर्वच विद्यार्थ्यांचा कल असतो. अशा वेळी वजन वाढण्याचा धोका असतो, म्हणून फळे जास्त प्रमाणात द्यावीत.

ड्राय फ्रुट

शक्य असल्यास बदाम, काजू, अक्रोड, मनुका, खारीक हे पदार्थ द्यावेत. परीक्षाकाळात बुद्धिला चालना देणारा सकस, सात्विक आहार घ्यावा.

आहार कोणता नसावा ?

उघड्यावरचे पदार्थ

उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. निरोगी आहार घ्यावा.

ॲसिडिटी वाढविणारे पदार्थ

acidity

अभ्यासाच्या काळजीने, मानसिक ताणतणावाने, सतत जागरणामुळे पित्त वाढून ॲसिडीटीचा त्रास विद्यार्थ्याला होण्याची शक्यता असते. अशा वेळी चमचमीत, चटपटीत, तिखट, तळलेले पदार्थ खाल्ल्यास अजून पित्त वाढून ॲसिडीटीचा त्रास वाढतो. म्हणून जास्त तिखट, तळलेले, चटपटीत, ॲसिडीटी वाढविणारे पदार्थ देऊ नयेत.

फास्ट फूड टाळावेत

fast food

पिझ्झा, बर्गर, बटाटावडा, कचोरी, भजी इ. पदार्थ तसेच चायनिज इत्यादी फास्ट फूड  पदार्थ टाळावेत. या पदार्थामुळे सर्दी, खोकला किंवा ॲलर्जीचा त्रास होण्याची शक्यता असते.

लर्जी असेल ते पदार्थ टाळावे

ज्या अन्नपदार्थांची पाल्यास ॲलर्जी असेल ते पदार्थ परीक्षाकाळात देणे कटाक्षाने टाळावेत. तसेच डबाबंद किंवा नवीन पदार्थ देणे टाळावे.

जास्त प्रमाणात आहार

परीक्षा कालावधीमध्ये नेहमीपेक्षा कमी प्रमाणामध्ये अन्न पदार्थाचे सेवन केलेले केव्हाही चांगले असते. जास्त प्रमाणात आहार घेतल्यामुळे सुस्ती येऊ शकते. त्यामुळे प्रमाणापेक्षा थोडे कमी किंवा प्रमाणातच खा, जास्त आहार घेऊ नका.

पूर्वी कधीही न खाल्लेले अन्नपदार्थ

परीक्षा कालावधी मध्ये यापूर्वी कधीही न खाल्लेले पदार्थ खाणे टाळावेत. जेणेकरून अपचनाचा तसेच आजारी पडण्याचा त्रास होणार नाही.

थंड पदार्थ

cold drink

थंड पाणी, कोल्ड्रिक्स्, आईस्क्रीम खाणे टाळावे. या पदार्थांमुळेही सर्दी, खोकला होण्याची शक्यता असते.

सारांश

परीक्षा

परीक्षा कालावधीमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपण आजारी पडणार नाही. आपण निरोगी असाल तर आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाची योग्य प्रकारे माहिती परीक्षांमध्ये देवू शकू.

आपण ही माहिती वाचली का ? रताळे सेवन करणे कोणी टाळावे?

Leave a comment