Google Contacts Marathi: नवीन फोन वर सर्व Contacts घ्या जुन्या फोन वरील (सर्वात सोपी पद्धत)

Google Contacts Marathi

आपण नवीन फोन घेतल्यानंतर आपल्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असतो आपल्या जुन्या फोन मधील सर्व कॉन्टॅक्ट नंबर आपण नवीन फोन वरती कशा पद्धतीने घ्यायचे? कारण कॉन्टॅक्ट नंबर हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असल्यामुळे ते आपणास नवीन फोन वर घेणे आवश्यक आहे.

आपल्या जुन्या फोन मधील असणारे कॉन्टॅक्ट नवीन फोनवर manually सेव करण्यासाठी किंवा नवीन पुन्हा सेव्ह करण्यासाठी आपला खूप वेळ जाऊ शकतो परंतु ते आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने सोप्या पद्धतीने नवीन फोनवरती घेऊ शकतो.

आपल्याकडे जर जुन्या फोन वर कॉन्टॅक्ट नंबर ची यादी सर्वात मोठी असेल, किंवा दोन ते तीन हजार कॉन्टॅक्ट आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असतील तर ते नवीन फोन वरती घेण्यासाठी आपण कोणती पद्धत अवलंबली  पाहिजे याबद्दलची माहिती आपण या पोस्ट द्वारे घेणार आहोत.

जुन्या फोन मधील सर्व कॉन्टॅक्ट नंबर आपण नवीन फोन वरती घेण्याच्या अनेक पध्दती आहेत, परतू सर्वात सोपी पद्धत आहे Google Contacts Marathi.

गुगल कॉन्टॅक्ट द्वारे जुन्या फोन मधील सर्व कॉन्टॅक्ट नंबर आपण नवीन फोन वरती घेण्याच्या स्टेप्स

१. कॉन्टॅक्ट Google Account वर सेव्ह करणे

आपण जुन्या फोनवरती जर कॉन्टॅक्ट नंबर गुगल कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह केले असतील तर ते ऑटोमॅटिकली नवीन फोन वरती येतात. त्यासाठी आपणास आपण जुन्या फोनवरती वापरलेल्या गुगल अकाउंट चे लॉगिन नवीन फोनवरती करणे आवश्यक आहे. लॉगिन केल्यानंतर सर्व कॉन्टॅक्ट नवीन फोन वर येतात यासाठी कोणतीही वेगळी पद्धत वापरण्याची आवश्यकता नाही.

कॉन्टॅक्ट Google Account वर सेव्ह कसे करावेत?

या ठिकाणी आपण 12345678 हा डेमो कॉन्टॅक्ट गुगल अकाउंट वरती सेव्ह करूया.

Google Contacts Marathi

आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये नंबर डायल केल्यानंतर न्यू कॉन्टॅक्ट या बटनावर क्लिक करावे.

Google Contacts Marathi

त्यानंतर कॉन्टॅक्ट चे नाव देऊन सेव्ह टू गुगल या ऑप्शनवर क्लिक करून Check mark, Wingdings font, character code 252 decimal.बटणावर क्लिक करावे अशा पद्धतीने आपण गुगल अकाउंट वरती आपला नवीन नंबर सेव्ह करू शकतो.

२. Contacts import export करणे (Google Contacts Marathi)

आपल्या मोबाईल मधील यापूर्वी सेव्ह केलेले नंबर जर गुगल अकाउंट वरती सेव्ह नसतील किंवा ते सिम कार्ड किंवा मोबाईलच्या डिवाइस मध्ये सेव्ह असतील तर ते गुगल अकाउंटला एक्सपोर्ट करण्याची पद्धत

यासाठी प्रथम स्टेप आहे आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधील कॉन्टॅक्ट या app वर जाऊन त्यामधील सेटिंग मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट हा पर्याय शोधणे.Google Contacts Marathi

त्यानंतर एक्सपोर्ट टू स्टोरेज या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल.

Google Contacts Marathi

त्यानंतर वरील फोटोमध्ये दिलेल्या पाथ प्रमाणे आपल्या मोबाईल स्टोरेज मध्ये किंवा मोबाईल फाईल मॅनेजर मध्ये ही vcf फाईल तयार होईल.

Google Contacts Marathi

या मोबाईल डिवाइस मध्ये तयार झालेल्या फाईल वरती क्लिक करावे.

Google Contacts Marathi

त्यानंतर वरील फोटो प्रमाणे विंडो आपल्यासमोर येईल त्यामधील ओके या बटणावर क्लिक करावे.

Google Contacts Marathi

त्यानंतर आलेल्या स्क्रीन मधून आपल्या गुगल अकाउंट वरती क्लिक करावे.

अशा पद्धतीने आपण आपल्या फोनमधील कॉन्टॅक्ट गुगल अकाउंट वरती ट्रान्सफर करू शकतात.

३. नवीन फोन वरील सेटअप ( Google Contacts Marathi)

नवीन फोन वरती आपणास जुन्या फोन मधील कॉन्टॅक्ट नंबर घेण्यासाठी नवीन फोन चालू केल्यानंतर आपणास नवीन फोन वरती जुन्या फोन मध्ये वापरलेला गुगलचा ई-मेल लॉगिन करावा लागेल.
जुन्या फोनवरील सेव्ह असलेले कॉन्टॅक्ट नंबर ऑटोमॅटिकली नवीन फोन वरती ट्रान्सफर होतील.

आपण हे गुगलच्या अधिकृत Google Contacts वेबसाईट वरती जाऊनही पाहू शकतो त्यासाठी गुगलची अधिकृत वेबसाईट आहे https://contacts.google.com/

सारांश

नवीन फोन वर जुन्या फोन वरील Google Contacts Marathi घेण्यासाठी वरील स्टेप वापरल्या गेल्या तर आपण सोप्या पद्धतीने सर्व Google Contacts नवीन फोन वर येतील. अशाप्रकारे Google Contacts Marathi याबद्दल सखोल माहिती आपण या लेखामध्ये पाहिली आहे

आपण हि माहिती वाचली का? तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत?

Leave a comment