चिरतरुण राहण्यासाठी चंदन पावडर लावल्याचे 6 फायदे: (Best Marathi)

चंदन पावडर

महाराष्ट्र तसेच भारतात चंदनाला पवित्र मानले जाते. धार्मिक विधीच्या वेळी चंदनाच्या टिळ्याच्या रूपात याचा वापर तुम्ही पाहिला असेल. तसेच, त्याच्या विविध गुणधर्मांमुळे, ते त्वचेसाठी देखील फार उपयोगी आहे. या लेखात आम्ही आरोग्यासाठी हिवाळ्यात चेहऱ्यावर चंदन पेस्ट लावल्याचे फायदे सांगणार आहोत. इतर झाडांप्रमाणेच चंदनाचेही झाड असते. त्याला सात्विक वृक्ष असेही म्हणतात.  हे झाड भारतात विविध ठिकाणी आढळते. याच्या लाकडाचा उपयोग अगरबत्ती बनवणे, हवन करणे, मूर्ती बनवणे, सजावटीचे साहित्य आणि इतर कामांमध्ये होतो. त्याच वेळी, त्याचे तेल परफ्यूम आणि आरोग्य थेरपीसाठी देखील  वापरले जाते.

१.त्वचेच्या संसर्गासाठी चंदन उपयुक्त

हिवाळ्यात त्वचेच्या संसर्गाची शक्यता वाढते. त्वचेचा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही चंदन पावडर वापरू शकता. चंदन पावडरमध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेला संक्रमण होण्यापासून वाचवतात. एवढेच नाही तर चंदन पावडर त्वचेची जळजळ कमी करण्यासही मदत करते.

२.त्वचेच्या ऍलर्जीसाठी चंदन पावडर महत्वाची

त्वचेच्या ऍलर्जीवरही चंदन फायदेशीर ठरू शकते. संशोधन असे सिद्ध झाले आहे कि ते सोरायसिस (त्वचेची समस्या) आणि त्वचेवर लाल खाज सुटणे यापासून आराम मिळण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. चंदनामधील असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेच्या ऍलर्जीसाठी उपयुक्त ठरत आहेत.

३.त्वचा निरोगी ठेवण्यास चंदन फायदेशीर

चंदन पेस्ट चा नियमित वापर केल्याने अनेक त्वचेच्या समस्या दूर होतात. चंदन पावडर त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

४.चेहऱ्यावरील जखमेवर चंदनाची पेस्ट

जखम जलद गतीने भरून येण्यासाठी चंदन लेप उपयुक्त आहे. हिवाळ्यात त्वचा वरील जखम लवकर दूर होत नाही. त्यामुळे हिवाळ्यात चंदनच्या च्या लेपाने जखम लवकर बरी होण्यास मदत होते.

५.सुरकुत्या टाळण्यासाठी चंदन फायदेशीर

वयोमानानुसार चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास चंदनाचा लेप फायदेशीर आहे चंदनाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होऊ लागतात त्यामुळे चंदन लेप खूप महत्त्वाची आहे.

६.संवेदनशील त्वचेला उपयुक्त

चंदन पावडर

संवेदनशील त्वचेसाठी चंदन चांगले फायदेशीर आहे. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही चंदन पावडर वापरून संवेदनशील त्वचा ठीक करू शकतात. हिवाळ्यात मुख्यत्वे  त्वचा संवेदनशील आणि कोरडी होते. अशा परिस्थितीत चंदन पेस्ट लावणे फायदेशीर ठरू शकते. चंदन त्वचेचा लालसरपणा आणि कोरडेपणा कमी करण्यास देखील मदत करते.

दाढ-दात दुखी आयुर्वेदिक औषध

चंदन पावडर चा वापर कसा करावा?

  • मुलतानी माती मध्ये त्याच प्रमाणत चंदन मिसळून त्याची पेस्ट तयार करावी.
  • चेहरा स्वच्छ धुवून नंतरच चंदन पेस्ट त्वचेवर लावावी.
  • आंघोळीच्या पाण्यातही चंदन पावडर मिसळून आपण त्या पाण्याने स्नान करू शकतो.
  • खोबरेल तेल आणि बदामाचे तेल चंदनात मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचा चमकदार होते.
  • चंदन आणि हळद मिक्स करून बनवलेल्या फेसपॅकमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, तुम्ही पेस्ट म्हणूनही वापरू शकता. यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.
  • चंदन पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर 10-15 मिनिटे तसीच राहू द्यावी.
  • नंतर स्वच्छ पाणी वापरून ती धुवून काढावी.

चंदन पावडर

चंदन आणि स्कीन

सारांश

चंदनातील  विविध औषधी गुणधर्मामुळे चंदन हे नेहमीच औषधी वनस्पती म्हणून वापरण्यात आलेले आहे. चंदनाचा वापर आपल्या पूर्वजापासून चालत आलेला आहे. चंदन पावडर च्या नियमित वापरामुळे त्वचेच्या तसेच इतर अनेक समस्या दूर होण्यास फायदा होत असतो. चंदन लावल्याने त्वचेवर चमक येते आणि त्वचेची चमक कायम राहते.

Leave a comment