रिंकू राजगुरू : बेधडक, प्रभावी अभिनेत्री Best Actress 2024

रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू

(pic credit Instagram)

हि अभिनेत्री मराठी कुटुंबातील आहे. तिचे वडील महादेव राजगुरू हे महाराष्ट्रातील अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयात शिक्षक आहेत. तिची आई, आशा राजगुरु, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. तिला सिद्धार्थ नावाचा एक धाकटा भाऊ आहे. 2017 मध्ये “सैराट” चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मराठी पुरस्कार तिला मिळाला आहे.

रिंकू राजगुरू बायोडेटा

नावरिंकू राजगुरू (टोपण नाव)
इतर नावप्रेरणा महादेव राजगुरू
जन्म३ जून २००१
जन्मठिकाणअकलूज
प्रथम चित्रपटसैराट (२०१६)
गाजलेला चित्रपटसैराट (२०१६)
बॉलीवूड पदार्पणझुंड (२०२२)
१० वी मार्क्स६६.४०
१२ वी मार्क्स८२.००

रिंकू राजगुरू

(pic credit Instagram)

रिंकू चा प्रथम चित्रपट ‘सैराट‘ या मराठी चित्रपटाने चित्रपटसृष्टी मध्ये चांगला नफा मिळावला होता. यात मुख्य भूमिका  रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी निभावल्या होत्या. प्रेम प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातून रिंकूला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. तिचे आर्ची हे नाव या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाले होते.

या चित्रपटामुळे रिंकू ला आपले आयुष्य बदलता आले. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीचा ‘कागर’ हा दुसरा मराठी चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला.

रिंकू राजगुरू चे काही चित्रपट

सैराट (रिंकू राजगुरू)

सैराट रिंकू राजगुरू

(pic credit Instagram nagraj manjule)

हा रिंकू चा पाहिला चित्रपट. या चित्रपटातील अभिनयामुळे रिंकू ची ओळख चित्रपटसृष्टी मध्ये निर्माण झाली. सैराट चित्रपट हा  मराठी मधील गाजलेला चित्रपट आहे. सैराट या चित्रपटासाठी चार करोड पेक्षा कमी बजेट लागले असून त्याची कमाई ११० करोडच्या वर गेलेली आहे. कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट देणारा हा मराठीतील पहिला चित्रपट ठरलेला आहे. रिंकू ची या चित्रपटातील डॅशिंग भूमिका सर्वांनाच आवडलेली आहे. पहिला चित्रपट असूनही खूप चांगला अभिनय या चित्रपटांमध्ये रिंकू राजगुरू या अभिनेत्री ने केला आहे. चित्रपटातील रिंकू चे ट्रॅक्टर चालवणे, बुलेट गाडी चालवणे यामुळे वेगळीच ओळख तिची या चित्रपटातून निर्माण झाली आहे.

कागर

Kagar movie rinku rajguru

(credit Instagram Viacom18Marathi)

मकरंद माने दिग्दर्शित कागर हा चित्रपट रिंकू चा दुसरा चित्रपट आहे.चित्रपटांमध्ये लीड रोलमध्ये रिंकू राजगुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती 2019 या वर्षी आला होता. हा चित्रपट राजकारणाशी संबंधित असून राजकीय गुरु व राजकारण यांच्या भोवती चित्रपट गुंफलेला आहे. चित्रपटांमध्ये रिंकू राजगुरू या अभिनेत्रीने  प्रियदर्शनी देशमुख भूमिका निभावलेली आहे

कागर चित्रपट Trailer

हा चित्रपट वर पाहण्यासाठी क्लिक करा. कागर चित्रपट

Hundred TV Series 2020

2020 या वर्षांमध्ये रिंकू राजगुरू यांनी हंड्रेड या टीव्ही Series मध्ये काम केले आहे. Hundred TV Series 2020 मधील नेत्रा (रिंकू राजगुरू) जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. वडील, भाऊ आणि आजोबा यांच्यातील ती  एकमेव कमावती व्यक्ती आहे. ब्रेन ट्यूमरमुळे आपणास फक्त 100 दिवस जगायचे आहे, हे कळल्यावर तिच्या  पायाखालची जमीन सरकते.

रिंकू राजगुरू

(pic credit Instagram)

‘सैराट’ या मराठी चित्रपटात अप्रतिम अभिनय आणि  कौशल्य दाखविणाऱ्या रिंकू राजगुरूच्या नैसर्गिक अभिनयाने छाप पडली आहे. रिंकू एक नैसर्गिक अभिनेत्री आहे, हे तिच्या या मधील अभिनयाने दिसून आले आहे. तीने आपले पात्र पूर्ण आत्मविश्वासाने निभावले आहे.

झुंड

नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट, या चित्रपटांमध्ये बॉलीवूडचा बादशाह अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रिंकू राजगुरू प्रथम चित्रपट आहे. सैराट या हिट मराठी चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री रिंकू हिने , अमिताभ बच्चन यांच्या झुंड या स्पोर्ट्स चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तीने मोनिका या मुंबईच्या झोपडपट्टीतील मुलीची भूमिका साकारली आहे. फोटो शेअर करताना रिंकूने तिच्या झुंडमधील पात्राची तिच्या चाहत्यांना ओळख करून दिली. तिने पोस्टला कॅप्शन दिले, “नमस्ते, माझे नाव मोनिका आहे.

रिंकू चे Instagram account

हे हि वाचा:- बेस्ट मराठी नायिका

 

Leave a comment