पवित्र पोर्टल कागदपत्रे | पवित्र पोर्टल द्वारे सेवेत हजर होताना कोणते कागदपत्रे तपासली जाणार?
पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या चालू आहे. या प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या नवीन हजर होणाऱ्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. यादीमध्ये नाव आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कागदपत्र तपासण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे आपल्याकडे असावी याबद्दलची माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत.
पवित्र पोर्टल कागदपत्रे यादी
- पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्व प्रमाणपत्राची प्रत (Certified copy) मूळ प्रत फोटोस्वाक्षरीसह
- एस.एस.सी. गुणपत्रक (दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)
- एस.एस.सी. प्रमाणपत्र (दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)
- पदवी परीक्षा गुणपत्रक (संबधित विषयात किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण)
- पदवी परीक्षा प्रमाणपत्र ( दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)
- पदव्युत्तर परिक्षा गुणपत्रक ( दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)
- पदव्युत्तर परिक्षा प्रमाणपत्रक ( दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे) व्यावसायीक अर्हता १२/०२/२०२३ पूर्वीची
- शिक्षणशास्त्र पदवी पात्रता D.ed/D.LEd/D.T.Ed/T.C.H.
- शिक्षणशास्त्र पदविकाप्रमाणपत्र D.ed/D.LEd/D.T.Ed/T.C.H.
- अध्यापनशास्त्र पदवी मार्कशीट B.Ed/B.Led/B.sc.Ed.
- अध्यापनशास्त्र पदवी प्रमाणपत्र B.Ed/B.Led/B.sc.Ed.
- M.S.C.I.T. प्रमाणपत्र
- शिक्षक पात्रता चाचणी पेपर-I (T.E.T.) प्रमाणपत्र (1 ते 5वी) केंद्रीय परीक्षा पात्रता चाचणी पेपर-I (CTET) प्रमाणपत्र (1 ते 5 वी)
- केंद्रीय परिक्षा पात्रता परिक्षा TET-२ (भाषा- कोणताही विषय उत्तीर्ण, गणित-गणित व विज्ञान पेपर उत्तीर्ण आवश्यक)
- अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक (T.A.I.T.) गुणपत्रक/यादी
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र (ST अनिवार्य आहे)
- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (SC,ST वगळून)
- लहान कुटूंब प्रतिज्ञापत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र (शालांत प्रमाणपत्र/शाळा सोडलेचा दाखला (दि. १६/१०/२०२३ रोजीचे वय)
- महाराष्ट्रातील रहिवाशी असलेचा अधिवास दाखला (सीमा भागातील ८६५ गावातील असल्यास रहिवाशी दाखला)
- आधारकार्ड / पासपोर्ट/पॅनकार्ड/ड्रायव्हींग लायसन्स
- अपंगत्वाचा दाखला (संगणकीय प्रणाली मार्फत वितरीत प्रमाणपत्र) (किमान ४०% दिव्यांग)
- माजी सैनिक दाखला
- खेळाडू प्रमाणपत्र (विभागीय क्रिडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा प्रस्ताव दाखला पोच पावती)
- प्रकल्पग्रस्त दाखला
- भूकंपग्रस्त दाखला
- अनाथ प्रमाणपत्र
- आत्महत्या त्रस्त शेतकरीचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- १९९१ जनगणना/१९९४ निवडणुक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र
- अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकारी तहसिलदार प्रमाणपत्र)
- विवाहानंतर नावात बदल असल्यास राजपत्र
- हमीपत्र (सादर केलेले दस्तऐवज वैद्य असलेबाबतचे हमीपत्र)
वरील यादीतील आपणास लागू असलेल्या पवित्र पोर्टल कागदपत्रे तपासणी साठी दोन ते तीन झेरॉक्स प्रती आपण तयार ठेवाव्यात. तसेच अधिक माहितीसाठी आपली ज्या ठिकाणी नेमणूक झाली आहे किंवा ज्या यादीमध्ये आपले नाव आलेले आहे तेथील कार्यालयाची संपर्क साधावा. किंवा कार्यालयाची वेबसाईट पहावी.
या ठिकाणी नमुना वेबसाईट म्हणून रायगड जिल्हा परिषदेची वेबसाईट ची लिंक देण्यात आलेली आहे.
वरील यादीतील दिलेल्या कागदपत्राच्या झेरॉक्स प्रति बरोबर आपणास मूळ कागदपत्रे ही सोबत ठेवावी लागणार आहेत.
पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या सर्व शिक्षकांच्या याद्या पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा