परीक्षेला सामोरे जाताना | या 15 टिप्स वापरल्या तर नक्की यशस्वी व्हाल | Best Marathi

या पोस्ट मधील माहिती

परीक्षेला सामोरे जाताना

परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी व पालकांनी काही टिप्स लक्षात घेणे गरजेचे आहे.  या लेखात दिलेल्या टिप्स विद्यार्थ्याने परीक्षा कालावधीमध्ये वापरल्या तर विद्यार्थी नक्की यशस्वी होतील . परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्याला अभ्यासाची काळजी वाटू लागते. आणि अभ्यासाचा वेळही वाढू लागतो. जेणेकरून आपल्याला चांगले गुण मिळू शकतील.

विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर आपण काय करावे?

विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर हा लेख पूर्ण वाचा. जर मुलांचे पालक हा लेख वाचत असतील तर त्यांनीही हे लक्षात घ्यावे. आणि मुलांना समजावून सांगावे जेणेकरून मुले उत्तम गुणांनी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतील.

परीक्षेला सामोरे जाताना परीक्षा देण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या टिप्स

1.योग्य आहाराकडे लक्ष द्या

परीक्षा

परीक्षेला सामोरे जाताना परीक्षा पूर्वी योग्य आहार असावा पचनास हलका असणारा आहार घ्यावा. परीक्षेला उपाशी पोटी जाऊ नये. परीक्षा कालावधीमध्ये आहार कसा असावा याची माहिती या ठिकाणी वाचा.

परीक्षा कालावधीमधील आहार.

2.परीक्षा केंद्रावर लवकर पोहचा

परीक्षेला सामोरे जाताना परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर जाणे आवश्यक आहे.  ऐनवेळी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बस न मिळणे, प्रवास सुखकर न होणे, प्रवासात अडथळा निर्माण होणे या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे केव्हाही एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर गेलेले चांगले असते.

3.ताणतणाव घेऊ नका

परीक्षेला सामोरे जाताना परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थी ताणतणाव घेऊन आजारी पडू शकतात. त्यामुळे कोणतेही टेन्शन न घेता पेपरला सामोरे जावे.

4.पुस्तकापेक्षा तुम्ही तयार केलेल्या नोट्स वाचा

परीक्षेला सामोरे जाताना

तुमची परीक्षा अगदी जवळ आली आहे, तेव्हा तुम्ही कोणते पुस्तक वाचावे? याकडे तुमची लक्ष असणे आवश्यक आहे. परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थ्यांना पुस्तकांची भीती वाटते. मी या विषयांचा अभ्यास केलेला नाही? माझी परीक्षा कशी असेल?

फक्त तुम्ही तयार केलेल्या नोट्स मध्ये सर्व माहिती थोडक्यात असल्यामुळे परीक्षा काळात फक्त तुम्ही तयार केलेल्या नोट्स वाचा. यामुळे तुमच्या मनातील अभ्यासाची भीती नाहीशी होईल. कोणत्याही प्रश्नाची किंवा विषयाची सखोल माहिती मिळवायची असेल तेव्हाच पुस्तक वापरावे.

5.मोबाईल बंद करा

मोबाईलचे अभ्यासाला खूप महत्त्व आहे. एखादा प्रश्न जर आपल्याला एखाद्या पुस्तकातून समजला नाही, तर आपण लगेच त्या प्रश्नाचे उत्तर गुगलवर शोधतो. आणि ते मिळवतो. पण परीक्षा देण्यापूर्वी मोबाईल वापरल्यास निरर्थक नोटिफिकेशन मेसेजमुळे आपल्याला  अभ्यासात अडचण येऊ शकते. म्हणून परीक्षेपूर्वी मोबाईलपासून दूर राहणे हे तुमच्या फायद्याचे आहे.

6.नकारात्मक विचार येऊ देऊ नका

परीक्षेला सामोरे जाताना

नकारात्मक विचार मनात आल्यावर आपण कोणत्याही कामात यशस्वी होत नाही. तर काय होईल? मला कमी मार्क्स मिळतील? नोकरी मिळेल का?  वगैरे विचार मनात येतात, पण अभ्यासावर सर्व लक्ष द्यायचे असते, जो काही अभ्यास केला असेल तो कागदावर नीट लिहावा लागतो. त्यामुळे नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार करू द्या. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून सकारात्मक विचार ठेवावा.

7.परीक्षेला सामोरे जाताना स्वतःला प्रेरित करा

जेव्हा तुम्ही प्रेरित असाल तेव्हाच तुम्ही अभ्यासात यशस्वी होऊ शकता. तुम्ही असे लोक पहाल ज्यांनी कोणत्याही स्रोताशिवाय अभ्यास केला आणि यशस्वी व्यक्ती बनल्या, गरिबीतही हिंमत हारली नाही.  परीक्षेला सामोरे जाताना स्वतःला प्रेरित ठेवणे आवश्यक आहे.

8.परीक्षेतील महत्त्वाच्या प्रश्नांची उजळणी करा

परीक्षेला सामोरे जाताना

तुमच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न आणि एकदा समजल्यानंतर तुम्ही नोट्सची मदत घेऊ शकता. अशा प्रकारे रिव्हिजन केल्याने तुम्हाला परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे चांगली आठवतील.

9.परीक्षेचे साहित्य तुमच्याकडे ठेवा

परीक्षेसाठी लागणारे सर्व साहित्य वेळेवर आपल्या बॅगेमध्ये भरून ठेवा. यामध्ये  स्केल, पेन्सिल, पेन, कंपास पेटी  इत्यादी साहित्य अगोदरच ठेवा. जेणेकरून ते कोणाकडूनही मागण्याची गरज नाही.

10.प्रवेशपत्र सोबत ठेवा

तुम्ही प्रवेशपत्र काळजीपूर्वक सोबत ठेवावे कारण त्याशिवाय तुम्ही परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि आणखी एक गोष्ट, त्याची प्रिंटआउट वेगळी ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रिंटआउट दाखवता येईल.

11.हातात घड्याळ घेऊन जा

परीक्षेला सामोरे जाताना

तुम्ही हातात घड्याळ घेऊन जा. जेणेकरून तुम्हाला परीक्षेची वेळ कळेल, किती वेळ शिल्लक आहे ? परीक्षेच्या खोलीत इतरांना, वेळ पुन्हा पुन्हा विचारावी लागणार नाही.

परीक्षेदरम्यान लक्षात ठेवायच्या काही टिप्स

परीक्षेला सामोरे जाताना परीक्षा सुरू असताना काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

12.प्रश्नपत्रिकेतील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा

परीक्षेला सामोरे जाताना

काही परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका मध्ये विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात. त्या काळजीपूर्वक वाचाव्यात.

13.प्रथम काठिण्य पातळी सोपी असणारे प्रश्न सोडवावेत

पेपर मध्ये आलेले अवघड प्रश्न सुरवातीला घेऊ नयेत. जे प्रश्न आपणास सोपे वाटतात ते सुरुवातीला घ्या.  एखादा अवघड प्रश्न सुरुवातीला जर घेतला तर तो व्यवस्थित न सोडवल्यामुळे आपल्या मनामध्ये भीती निर्माण होईल आणि त्याचा परिणाम इतर प्रश्नावरही होईल त्यामुळे सुरुवातीला सोपे प्रश्न सोडवावेत.

14.प्रश्न व्यवस्थित वाचून समजून उत्तर सोडणे

प्रश्न व्यवस्थित वाचून स्वतः समजून घ्यावा. प्रश्नाचे आकलन होणे खूप गरजेचे आहे. प्रश्नाचा अर्थ समजला नाही तर उत्तर वेगळ्या पद्धतीने दिले जाऊ शकते.

15.घड्याळाकडे लक्ष ठेवा

परीक्षेमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेवर सर्व पेपर सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली लक्ष घड्याळाकडे असणे आवश्यक आहे.

सारांश

  • परीक्षेला सामोरे जाताना मनातील भीती नाहीशी करा.
  • परीक्षेला सामोरे जाताना सकारात्मक विचारसरणी ठेवा.
  • परीक्षेला सामोरे जाताना आहाराकडे लक्ष द्या.
  • परीक्षा कालावधीमध्ये कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची भांडण असू नये.