कीटकनाशके (Pesticides) वापर best मराठी

कीटकनाशके काय आहेत

कीटकनाशके ही रासायनिक संयुगे आहेत जी कीटक, उंदीर, बुरशी आणि तण यासह कीटक मारण्यासाठी वापरली जातात. जगभरात 1000 पेक्षा अधिक विविध कीटकनाशके वापरली जातात.

याचा वापर सार्वजनिक आरोग्यामध्ये रोगाचे वाहक, जसे की डासांना मारण्यासाठी आणि शेतीमध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या कीटकांना मारण्यासाठी केला जातो.

खरेदी करताना घ्यावयाची काळजी

  • वैध कृषी परवाना असलेल्या नोंदणीकृत किंवा अधिकृत विक्रेत्यांकडूनच कीटकनाशके खरेदी करा.
  • फूटपाथ विक्रेत्यांकडून किंवा परवाना नसलेल्या व्यक्तीकडून औषधे खरेदी करू नका.
  • एका विशिष्ट क्षेत्रात एका फवारणीसाठी आवश्यक असतील तेवढेच औषधे खरेदी करा.
  • संपूर्ण हंगामासाठी मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करू नका.
  • डब्यावर मान्यताप्राप्त लेबल नसलेली औषधे खरेदी करू नका. expiry झालेले कीटकनाशक कधीही खरेदी करू नका.
  • कीटकनाशकांच्या डब्यावरील तसेच पॅकेटवरील माहिती  पहा.
  • लेबलांवर बंच क्रमांक, नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता (expiry date)पहा.

कीटकनाशके

साठवणुक कशी असावी

  • फवारणीचे औषधे घरापासून दूर ठेवा.
  • मूळ डब्यामध्ये किंवा पॅकेटमध्ये औषधे ठेवा.
  • कीटकनाशके तसेच तणनाशके स्वतंत्रपणे साठवली पाहिजेत.
  • जेथे औषधे साठवली गेली आहेत, ते क्षेत्र चेतावणी चिन्हांसह चिन्हांकित केले जावे.
  • औषधे मुलांच्या आवाक्याबाहेर आणि जिवंत साठ्यापासून दूर ठेवावीत. साठवण ठिकाण थेट सूर्यप्रकाश आणि पावसापासून चांगले संरक्षित केले पाहिजे.
  • घराच्या आवारात कधीही कीटकनाशके ठेवू नका.
  • मूळ डबा किंवा पॅकेटमधील किटकनाशके दुसऱ्या भांडयामध्ये ओतून ठेवु नका.
  • तणनाशके व कीटकनाशके एकत्र साठवू नका.
  • मुलांना व जनावरांना साठवणुकीच्या ठिकाणी जाऊ देऊ नका.
  • कीटकनाशकांना थेट सूर्यचा प्रकाश लागु नये किंवा ती पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ नयेत यासाठी योग्य ती आवश्यक काळजी घ्या.

हाताळताना कोणती काळजी घ्यावी

  • वाहतूक करताना कीटकनाशके इतर पदार्थापासून वेगळे ठेवा.
  • मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी कीटकनाशके कुशलतेने हाताळावीत.
  • फवारणीचे द्रावण तयार करताना नेहमी स्वच्छ पाणी वापरा.
  • संपूर्ण शरीर झाकण्यासाठी संरक्षक कपडे उदा., हातमोजे, फेस मास्क, टोपी, पूर्ण पायघोळ संरक्षणात्मक कपडे इत्यादी वापरा.
  • औषधे द्रावणाच्या गळतीपासून नेहमी तुमचे नाक, डोळे, कान, हात इत्यादीचे संरक्षण फरा.
  • व्यापरण्यापूर्वी कीटकनाशकचा डबा तसेच पॅकेटच्या लेबलवरील दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • सीलबंद नसलेल्या, गळती होत असलेल्या डब्यामधून तसेच  पॅकेटमधुन कीटकनाशके खरेदी करू नका.
  • अन्न,चारा,इतर खाण्यायोग्य वस्तूंसोबत कधीही कीटकनाशके बाळगू नका किंवा वाहतूक करू नका.
  • मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी कीटकनाशके डोक्यावर,  पाठीवर वाहून नेऊ नये.

कीटकनाशके

कीटकनाशके फवारणीचे द्रावण तयार करताना घ्यायची काळजी

  • गढूळ किंवा साचलेले पाणी वापरू नका.
  • संरक्षणात्मक कपडे परिधान केल्याशिवाय स्प्रे द्रायण कधीही तयार करू
  • द्रावण शरीराच्या कोणत्याही अवयवांवर पडू देऊ नका.
  • वापरासाठी पॅकेट लेबलवरील सूचना वाचणे कधीही टाळू नका.
  • फवारणीचे शिल्लक राहीलेले द्रावण तयार केल्याच्या 24 तासांनंतर कधीही वापरु नफा.
  • औषधे वापरण्यापूर्वी लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे.
  • डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली औषधे सर्वात विषारी त्यानंतर पिवळा ,निळा व हिरवा असा क्रम लागतो.
  • हि चिन्हे सोपी असतात जे सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वात कमी विषारी असतात.

सांकेतिक चीन्हे व माहिती

  • तणनाशके फवारणीचा पंप कधीच चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये.
  • फवारणी करतांना योग्य कपडे ,बुट,हातमोजे, नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा.
  • कीटकनाशक, बुरशीनाशक, खते व टॉनिक यांची एकत्रित फवारणी कधीच करू नये.
  • औषधाच्या डोसची नोंद घ्या. कधी कधी औषध खूप कमी किंवा जास्त घेतल्याने आपणास योग्य परिणाम मिळत नाही.
  • नेहमी स्वच्छ हवामानात फवारणी करा.
  • पाऊस पडण्याची शक्यता असताना फवारणी टाळावी.
  • कडक सूर्यप्रकाशातही फवारणी करू नका.
  • नेहमीच सकाळी किंवा संध्याकाळी औषधे व खतांची फवारणी करा.
  • औषधे व इतर पोषक फवारणी करताना शेतात योग्य प्रमाणात ओलावा असावा.
  • फवारणी पंप खरेदीसाठी क्लिक कारा.

बाधित व्यक्तीची घ्यावयाची काळजी.

  • औषधे पोटात गेल्यास किंवा त्वचा ,डोके,श्वसनेंद्रिया द्वारे विषबाधा होऊ शकते.
  • व्यक्तीस विषबाधा झाल्यास झाल्यास अपघात स्थानापासून बाजूला घेऊन जावे.
  • त्याच्या अंगावरील कपडे सैल करून बदलावे.
  • रोग्याचे अंग, बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे. व कोरड्या टॉवेलने पुसावे.
  • औषधे पोटात गेलेले असल्यास रोग्याला ताबडतोब ओकारी करण्याची उपाय योजना करावी.
  • रोग्याला पिण्यासाठी बिडी किंवा सिगारेट व तंबाखू देऊ नये.
  • रोग्याला जास्त घाम येत असल्यास त्यास कोरड्या टॉवेलने पुसावे व कपडे सैल करावे.
  • रोग्याला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून ध्यावे.
  • रोग्याचा श्वसनक्रिया योग्य रीतीने सुरु आहे का ते तपासावे.
  • रोग्याचा श्वसनक्रिया अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित रोग्याच्या
  • तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वसनक्रिया सुरु करावा.
  • रोग्याला झटके येत असल्यास रोग्याच्या दातांमध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.
  • कीटकनाशकामुळे बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणायचे प्रयत्न करू नये.
  • बेशुद्ध रोग्याला काहीहि खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये.
  • रोग्याला त्वरित कीटकनाशकाच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांकडे घेऊन जावे.
  • डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करावे.
  • रोगी पूर्ण  बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

आपणास हे माहित असायला हवे.