ई पीक पाहणी काय आहे?
E Peek Pahani प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्र राज्यात सुरू झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागाने ई पीक पाहणी प्रकल्प सुरू केला आहे.
- हे ॲप शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती आणि पीक अहवाल देण्यासाठी मदत करते.
- याद्वारे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची सद्यस्थिती तलाठी कार्यालयात ठेवली जाते.
- GPS प्रणालीचा वापर करून पिकाचा फोटो E Peek Pahani ॲपवर अपलोड केला जाईल.
- याद्वारे शेतकरी स्वतः हे ॲप डाऊनलोड करून त्यांच्या स्वतःच्या पिकांची नोंदणी करू शकतात.
- E Peek Pahani शेतकर्याने स्वतः च्या पिकांची नोंदणी सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन करणे.
- महाराष्ट्र शासनाचा कृषी व महसूल विभागाने पीक पाहणी नावाच्या प्रकल्प सुरू केला आहे.
- E Peek Pahani म्हणजे तुमच्या शेतीच्या सातबारावर पिकांची नोंद करणे.
- या पूर्वी पीक पाहणी नोंदणी सातबारा उतारा वरून तलाठी करायच्या परंतु आता महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणी हे नवीन माध्यम चालू केले आहे.
- ई पीक पाहणी ॲप म्हणजे ऑनलाईन पद्धतीने शेतातील पिकांची पाहणी करणे असा अर्थ होतो.
- ई पीक पाहणी च्या साह्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून त्यांच्या शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी करून त्यांची नोंदणी ई पीक पाहणी या ॲप च्या मदतीने करता येणार आहे.
E Peek Pahani बद्दल महत्वाचे
- राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती ७/१२ वर आणण्यासाठी पिक पाहणी नोंद करणे आवश्यक आहे.
- २०२२ पासून शेतकरी त्यांच्या मोबाईल वरूनच पिक पाहणी नोंद करत आहेत.
- परंतु यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत तसेच पिक पाहणी नोंद यशस्वी झाली आहे का नाही हेदेखील शेतकऱ्यांना कळायला मार्ग नाही.
- आता तुम्ही तुमच्या गावची पिक पाहणी नोंद झालेल्या शेतकऱ्यांची यादी याद्वारे पाहू शकणार आहात.
- २०२३ मधील खरीप हंगामासाठी राज्य सरकार कडून ०१ जुलै २०२३ रोजी पिक पाहणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
- ०१ जुलै २०२३ पासून राज्यातील खूप शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मधून पिक पाहणीची नोंद ७/१२ वर केली आहे.
- शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरून ई पिक पाहणी च्या एप्लिकेशन मधून पिक पाणी नोंद न केल्यास तुमच्या ७/१२ वर चालू वर्षाची पिक पाणी नोंद लागणार नाही.
- आणि परिणामी त्यामुळे तुम्हाला पीकविमा, नुकसान भरपाई, कर्ज देखील मिळणार नाही.
- कारण त्या जमिनीला पडीक क्षेत्र म्हणून धरले जाणार आहे.
E Peek Pahani केल्याचे फायदे
- शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
- गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी यामुळे सहज उपलब्ध होणार आहे.
- ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसारख्या योजनांचा लाभ खातेधारकांना अचूक रित्या देणे यामुळे शक्य होणार आहे.
- खातेनिहाय आणि पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होत असल्याने शासनाला सदर माहिती उपयुक्त ठरणार आहे.
- खातेदार निहाय पीक पाहणीमुळे खातेदार निहाय पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भारपाई हे यामुळे शक्य होणार आहे.
- कृषि गणना अत्यंत सोप्या पद्धतीने व अचूक रित्या करता येईल.
ई पीक पाहणी मुदतवाढ
शेतकऱ्यांना येत असणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आणि या एप्लिकेशनचे सर्व्हर हि अनेकदा काम करत नसल्याने शेतकऱ्यांना पिक पाहणी नोंद करण्यासाठी आता २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.२५ सप्टेंबर च्या आत मध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मधून पिक पाहणी नोंद करून घ्यावी. नाही केली तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान नुकसान होऊ शकेल.
E Peek Pahani गावची यादी कशी पहायची
- E Peek Pahani एप्लिकेशन ओपन करून तुम्हाला खातेदार नोंदणी करून घेयची आहे.
- त्यानंतर खातेदाराचे नाव निवडून पुढे जायचे आहे.
- होम पेज वर तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील यातच तुम्हाला गावाचे खातेदारांची पिक पाहणी हा पर्याय निवडायचा आहे.
- हे केल्यानंतर तुमच्या गावातील सर्व खातेदारांचे नाव याठिकाणी तुम्हाला दिसतील.
- यामध्ये ज्या खातेदारांच्या नावासमोर हिरव्या कलर मध्ये Eye डोळे आयकॉन दिसत असेल अशा शेतकऱ्यांची पिक पाहणी यशस्वी झाली आहे असा त्याचा अर्थ आहे.
- ज्या शेतकऱ्यांच्या नावासमोर असलेला डोळ्याचा आयकॉन पांढऱ्या कलर मध्ये असेल अशा शेतकऱ्यांची पिक पाहणी अजुनही झालेली नाही असा त्याचा अर्थ होतो.
- तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल आणि तुमची नोंद राहिली असेल तर तुम्हाला ती २५ सप्टेंबर पर्यंत करता येईल.
E Peek Pahani नोंद न केल्यास काय होईल?
- शेतकऱ्याचा सातबारा निघणार नाही.
- त्या क्षेत्रावर कोणतेही कर्ज मिळणार नाही.
- पीकविमा लाभ मिळणार नाही.
- नुकसान भरपाई मिळणार नाही.
- क्षेत्र पडीक म्हणून ग्राह्य धरले जाईल.
- अनुदान मिळणार नाही.
- वरील अनेक अडचणी तुम्हाला येणार असल्याने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून ई पिक पाहणी नोंद करून घ्यावी.
एका मोबाईलवरून किती खातेदारांची नोंदणी करता येणार?
एका मोबाईलवरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार आहे. एखाद्या शेतकऱ्याकडे स्वत:चा फोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा कोणाचाही र्स्माटफोन वापरता येईल.
अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतात. सामायिक खातेदार च्या बाबतीत त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
ई पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया काय?
नोंदणी साठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वरून इ -पीक पाहणी अॅप डाऊनलोड करून मोबाईल क्रमांकाची नोंद करावी लागेल.
सातबारा मधील नावाप्रमाणे सर्व खातेदारांना त्यांच्या नावाची अचूकपणे नोंद याठिकाणी करावी लागणार आहे.
अॅप डाऊनलोड लिंक
मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी अॅप 2.0 हे व्हर्जन चे अॅप डाऊनलोड करावे. खालील लिंक वरून वर क्लिक करून अॅप डाऊनलोड करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en_IN&gl=US
ई पीक पाहणी अॅप मधील काही महत्वाचे बदल
- 1 ऑगस्टपासून मोबाईल (E-Pik Pahani)हे अॅप बदलण्यात आले आहे.
- शेतकऱ्यांना चार पिकांचा समावेश करता येणार आहे. यामध्ये एक मुख्य आणि ३ दुय्यम पिकांचा सहभाग राहणार आहे.
- आधीचे अॅप बंद करण्यात आले असून शेतकऱ्यांना यंदा त्या संबंधित गटामध्येच जाऊन माहिती भरावी लागणार आहे.
- चुकीची माहिती या अॅप मध्ये भरली तर अॅप ते स्विकारत नाही.
- एक मुख्य आणि ३ दुय्यम पिकांचा समावेश करता येणार आहे.
- दुय्यम पिकांच्या लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदवण्याचीही (E-Pik Pahani) या अॅप मध्ये सोय करण्यात आली आहे.
- त्यामुळे दुय्यम पिकांची बरोबर माहिती मिळण्यास मदत होते.
- शिवाय शेतकऱ्यांना माहिती भरताना अडचणी निर्माण झाल्या तर त्याचे निराकरण करण्यास अपमध्येच काल आले आहे, जेणेकरून नेहमी विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरेही तिथे असणार आहेत
E Peek Pahani ग्राहक सेवा नंबर
अधिक माहितीसाठी गावातील तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा शंका असल्यास 020257127120 या क्रमांकावर कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या मनातील शंका निवारण करू शकता.