जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी | रोहा महारांगोळी | Best Marathi 2024

रोहा महारांगोळी जगातील सर्वात मोठी रांगोळी

संपूर्ण जगामध्ये आतापर्यंत काढण्यात आलेल्या सर्व रांगोळी पैकी ही सर्वात मोठ्या जागेवर काढण्यात आलेली रांगोळी आहे. म्हणूनच ही जगातील सर्वात मोठी रांगोळी ठरणार आहे व तसा विश्वविक्रम ही या रोहा नगरीमध्ये घडून येणार आहे.

रोहा रांगोळी

रोहा शहरात भुवनेश्वर या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याकारणाने  महारांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे.  या निमित्ताने जगातील सर्वात मोठी रांगोळी साकारण्यात येत आहे. या रोहा महारांगोळी बद्दल आपण या थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

350 वा राज्याभिषेक सोहळा आणि रोहा महारांगोळी

रोहा महारांगोळी

दिनांक 6 जून 2024 रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेकाचा सोहळा होणार आहे त्या निमित्ताने रोहा या ठिकाणी महारांगोळी चे आयोजन केले आहे.

भुवनेश्वर येथील क्रिकेटचे मैदान

रोहा या ठिकाणी असणाऱ्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर या गावामध्ये हे क्रिकेटचे मैदान आहे. महा रांगोळी साकारण्यासाठी रोहा शहराजवळील असणाऱ्या भुवनेश्वर परिसरामधील क्रिकेटच्या मैदानामध्ये या महा रांगोळीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सुनीलजी तटकरे यांच्या संकल्पनेतून रांगोळी

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Kudwa (@amit_kudwa)

रायगडचे विद्यमान खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून या महा रांगोळीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 4 मार्च 2024 रोजी आमदार अनिकेत तटकरे आणि महिला व बालकल्याण मंत्री कु. आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते या रोहा महारांगोळी चा शुभारंभ करण्यात आला.

सांगली येथील रांगोळीचे कलाकार

या महा रांगोळीच्या निमित्ताने सांगली येथील शंभर पेक्षा अधिक रांगोळी कलाकार यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर रोहा या ठिकाणी असणारे स्थानिक कलाकार ही  त्यामध्ये मदत करत आहेत. सांगली या ठिकाणाहून आलेले सर्व कलाकार All is well चे आहेत. सलग बहात्तर तास हे रांगोळी कलाकार रांगोळी काढत होते. रात्रीही रांगोळी काढण्याची काम सुरू होते. रात्री काम सुरू असतानाचा हा फोटो.

रोहा महारांगोळी

रोहा महारांगोळी १ लाख २५ हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये

सदरची महा रांगोळी एक लाख 25 हजार स्क्वेअर फुट पेक्षा ही अधिक मोठ्या जागे मध्ये साकारण्यात आलेली आहे. एवढ्या मोठ्या भव्य जागेवर ही रांगोळी साकारण्यात आल्यामुळे विश्वविक्रम या ठिकाणी होणार आहे.

७२ तासांमध्ये रोहा महारांगोळी

रोहा या ठिकाणी साकार होत असलेली महारंगोळी बहात्तर तासांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. रोहा महा रांगोळी मध्ये समाविष्ट असणारे रांगोळी कलाकार आपल्या कलेचे प्रदर्शन करून रोहा व रायगड मधील तसेच राज्यातीतील नागरिकांसाठी ही भव्य महारांगोळी खुली करून देणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by NCP Official (@ncpspeaksone)

दहा दिवस नागरिकांसाठी खुली

सदर महा रांगोळी ही  रांगोळी प्रेमी तसेच कला प्रेमींसाठी दहा दिवस खुली असणार आहे. दिनांक 7 मार्च 2024 ते दिनांक 17 मार्च 2024 पर्यंत ही महा रांगोळी नागरिकांसाठी खुली असणार आहे. रोहा महारांगोळी पाहण्यासाठी राज्यभरातील तसेच देशभरातील शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.  रोहा रांगोळी सर्व शिवभक्तांसाठी ,सर्व शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

रोहा महारांगोळी साकारत असतानाचा व्हिडिओ

आपण ही माहिती वाचली का?

महा रांगोळी चे लोकेशन

https://maps.app.goo.gl/76Vyb1ehEYwERk3ZA

सदर रांगोळी चे अधिक फोटो लवकरच या ठिकाणी उपलब्ध होतील.

रोहा महारांगोळी

रोहा महारांगोळी