फोटो साईज कमी करणे
आजकाल कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करणे ही एक सामान्य बाब बनली आहे. सोशल मीडिया असो किंवा इतर कोणतेही इंटरनेटचे माध्यम असो, प्रत्येकाला आपले फोटो जगासोबत शेअर करायचे असतात. तथापि, काहीवेळा फोटो फाइल्स खूप मोठ्या असतात किंवा त्याचा आकार खूप मोठा असतो, ज्यामुळे इंटरनेटच्या कनेक्शनच्या स्पीडवर परिणाम होऊ शकतो. तसेच फोटो स्टोरेज करण्यासाठी जास्त मेमरीची आवश्यकता भासू शकते. त्याच बरोबर सद्या नोकरीचे आणि इतर सर्व ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्या फोटोची आणि स्वाक्षरीची साईज मर्यादित असते किंवा ठराविक KB मध्ये आवश्यक असते. त्यामुळे फोटो साईज कमी करणे खूप महत्वाचे आहे. आणि प्रत्येकाला ते करता आले पाहिजे त्या दृष्टीने हि पोस्ट तयार करण्यात आली आहे.
फोटोचा आकार महत्त्वाचा का आहे?
फास्ट अपलोड साठी
लहान फोटो फाइल्स जलद अपलोड होतात. वेग अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे फोटोचा आकार कमी असणे महत्वाचे आहे.
डेटा आणि स्पेस सेव्हिंग
फोटोचा लहान आकार असेल तर तुम्हाला तुमचा इंटरनेट डेटा कमी लागतो आणि स्पेस सुद्धा कमी लागतो, विशेषत: जेव्हा तुम्ही इंटरनेटपासून दूर असता किंवा स्लो इंटरनेट कनेक्शनचा असेल तेव्हा तर तो आकार कमी असणे महत्वाचे असते.
सोशल मीडिया शेअरिंगसाठी महत्वाचा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटोचा आकार कमी करून, तुम्ही तुमचे फोटो सहज आणि फास्ट पणे शेअर करू शकतात आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात.
फोटो साईज कमी करणे प्रोसेस
ऑनलाइन फोटो साईज रिडक्शन टूल्स
अनेक ऑनलाइन टूल्स उपलब्ध आहेत जी तुम्हाला फोटो साइज कमी करण्यासाठी मदत करतात. काही ऑनलाइन फोटोचा आकार कमी करण्याची साधने आहेत जी विनामूल्य आहेत तर काही टूल्स साठी पैसे लागतात. ते फाइलचा आकार कमी करण्यासाठी तुम्हाला विविध पर्याय देतात.
ॲप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअरचा वापर
अशी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत जी तुम्हाला मोठ्या फोटो फाइल्स कमी करण्यात मदत करू शकतात. यापैकी काही सॉफ्टवेअर विनामूल्य असू शकतात तर काहींना परवाना आवश्यक असू शकतो.
स्मार्टफोन ॲप्लिकेशन्स
अनेक स्मार्टफोन ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला फोटोचा आकार सहज कमी करू देतात. हे ॲप्लिकेशन्स वापरण्यासाठी युजर फ्रेंडली असतात.
PC किंवा LAPTOP वर फोटो साईज कमी करणे
आपल्याला खालील फोटो ची साईज कमी करायची आहे.
ती प्रोसेस आपण पाहूया.
या फोटोची ओरीजनल साईज ११४ केबी आहे. जी आपण फोटोवर राईट क्लिक करून properties वर क्लिक करून पाहू शकाल.
लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वर आपल्याला फोटो साईज कमी करणे आवशयक असेल तर आपणाकडे ज्या फोटोची साईज कमी करायचे आहे त्या फोटो वरती राईट क्लिक करून ओपन विथ पेंट या ऑप्शन वर क्लिक करून तो फोटो एडिट करता येतो.
त्या नंतर resize या बटनावर क्लिक करून PIXELS मध्ये असलेल्या अंकापेक्षा कमी अंक टाकून सेव या बटनावर क्लिक करावे. फोटो चा आकार कमी झालेला दिसेल.
या ठिकाणी पूर्वीचा ओरिजनल horizontal आकार 1600 आहे vertical आकार 600 आहे. तो आपण अर्धा करूया. आणि ओके बटनावर क्लिक करुयात.
ओके बटनावर क्लिक केल्यानंतर सेव या ठिकाणी क्लिक केले की आपला फोटो कमी आकाराचा तयार झालेला असेल. या उदाहरणात तो ११४ केबी वरून ४६ केबी झालेला दिसून येत आहे.
अशाप्रकारे आपण लॅपटॉप वरती किंवा डेस्कटॉप वरती काम करत असाल तर फोटोची साईज कमी करू शकतोत.
मोबाईलवरून फोटो साईज कमी करणे
मोबाईल द्वारे फोटोची साईज कमी करण्यासाठी उपयुक्त असणारे असेच एक अँड्रॉइड चे ॲप जे की प्ले स्टोअर वर विनामूल्य उपलब्ध आहे याबद्दल आपण डिटेल्स माहिती पाहूया. या ॲप्लीकेशन चे नाव आहे compress image size in kb & mb हे ॲप्लीकेशन फक्त 2 mb चे असून त्याचा रेटिंग चांगला आहे जो की ५ पैकी ४.३ आहे. याचेच दुसरे नाव qreduce lite हे आहे.या ॲप ची लिंक compress image size in kb & mb
हे ॲप ओपन करून choose फोटोज हा ऑप्शन निवडून ज्या फोटोची साईज कमी करायचे आहे तो फोटो सिलेक्ट करावा.
या ठिकाणी आपणास 135 kb चा फोटो 20 kb मध्ये करायचा आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण तो करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी आपणास 20 हा अंक टाकून कॉम्प्रेस या बटणावर क्लिक करायचे आहे. कॉम्प्रेस बटनावर क्लिक केल्यानंतर तो फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव झालेला आपणास पहावयास मिळेल.
तसेच या ठिकाणी शेअर या बटनावर क्लिक करून आपण तो फोटो सोशल मीडिया व इतर माध्यमातून पाठवू शकतो. अशाप्रकारे आपण मोबाईल फोन च्या मदतीने ही फोटोची साईज कमी करू शकतोत.
online फोटो साईज कमी करणे
जर आपणास कडे चांगले इंटरनेट कनेक्शन असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने ही फोटोची साईज कमी करू शकतो. त्यासाठी आपणस https://www.img2go.com/ या वेब साईट वर जावे लागेल.
compress image या बटनावर क्लिक केल्यानंतर ज्या फोटोची साईज कमी करायचे आहे तो फोटो या ठिकाणी आपणास अपलोड करायचा आहे.
मी या उदाहरणांमध्ये या फोटोची साईज 40% ठेवणार आहे. त्यामुळे मला 40% निवडून स्टार्ट या बटनावर क्लिक करावे लागणार आहे.
स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर काही वेळामध्ये प्रोसेस होऊन आपणास डाउनलोड चे बटन दिसेल डाउनलोडच्या बटणावर क्लिक करून आपण तो फोटो डाउनलोड करून घेऊ शकतो.
अशाप्रकारे आपण विविध माध्यमातून फोटो साईज कमी करणे प्रोसेस करू शकतोत. महत्वाची टिप्स आपणास जो फोटो कमी केबी मध्ये हवा आहे किंवा फोटो साईज कमी करणे गरजेचा आहे तो फोटो आपण व्हाट्सअप या सोशल मीडिया द्वारे शेअर केला तर समोरच्या व्यक्तीला तो कमी केबी मध्ये प्राप्त होईल.
आपण हि पोस्ट वाचली का ? PhonePe वरून बँक स्टेटमेंट कसे काढायचे
सारांश
फोटोचा आकार कमी करणे ही एक योग्य आणि आवश्यक प्रक्रिया आहे जी तुम्हाला तुमच्या इंटरनेट कनेक्शनवर स्पेस वाचविण्यात मदत करते आणि तुमचे फोटो फास्ट आणि सुरक्षितपणे शेअर करण्यात मदत करू शकते. ऑनलाइन टूल्स, सॉफ्टवेअर आणि स्मार्टफोन अप्लिकेशन वापरून तुम्ही फोटोचा आकार सहजपणे कमी करू शकतात.