राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना NMMSS Scholarship

NMMSS Scholarship (National Means-Cum Merit Scholarship Scheme)

शिक्षण कार्यमंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे.

NMMSS Scholarship बद्दल थोडक्यात 

  • राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMSS ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन २००७-०८ या वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता ८वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.

आयोजन

  • राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे मार्फत केले जाते.
  • इयत्ता ८वी मध्ये शिकत असलेल्या शिष्यवृत्ती निकषानुसार पात्र विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षा घेतली जाते.
  • सदर विद्याथ्यांना इयत्ता ७ वी मध्ये किमान ५५ टक्के गुण असावे. (SC ST यांना गुणामध्ये ५ टक्के सवलत)
  •  सदर परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराथी, तेलगु, सिधी व कन्नड या माध्यमातून घेतली जाते.
  • सदर परीक्षेचे शुल्क १०० रु व शाळा संलग्नता शुल्क २०० रु आकारले जाते.
  • सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा इ. ८वी पर्यंतचा राज्यशासनाचा आहे.

NMMSS Scholarship पेपर 

  • पेपर १ बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)
  • पेपर २ शालेय विषयक क्षमता चाचणी (SAT) – (सामान्य ज्ञान ३५ गुण सामाजिक शास्त्र ३५ गुण, गणित २० गुण)
  • दोन्ही पेपर साठी प्रत्येकी ९० गुण व वेळ ९० मिनीटे
  • सदर परीक्षेमधून राज्याला ठरवून दिलेल्या (११६८२) कोटयानुसार निवडलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत तयार केली जाते.
  • शासन निर्णय क्र. २० ऑगस्ट, २०१८ पासून परीक्षेत निवड झालेल्या विद्याथ्यांना इ.१ ते इ.१२ वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती मिळते.

 

NMMSS Scholarship परीक्षाचे स्वरूप 

Pre Matric Scholarship For Minority in Marathi

  •  सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका सोबत देण्यात येते.
  • विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येते. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातात.
  • प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतात.
  • योग्य पर्यायाचे वर्तुळ निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे असते.
  • पेन्सिलचा वापर केलेली,अर्धी,अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जात नाही.
  •  एकापेक्षा जास्त वर्तुळात नोंदविलेली उत्तरे, चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे, व्हाईटनर किंवा खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जात नाही.

अंमलबजावणी

  • सन २०१७.१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या वेबसाईटवरून करण्यात येत आहे.
  • विद्यार्थ्याने नवीन व नूतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने भरलेले  अर्ज  शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर सादर करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यात या  योजनेची अंमलबजावणी राज्य शासनाच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे.
  • तसेच पात्र लाभार्थ्याना शिष्यवृत्तीचा लाभ Public Finance Management System PFMS मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा केली जाते.

NMMSS Scholarship चे उद्दिष्टे

  • इयत्ता ८वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्याण्यांचा शोध घेऊन बुध्दीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे.
  • विद्याथ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे.
  • आर्थिक मागासलेपणा या करणामुळे हुशार विद्यार्थ्याची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती थांबावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

NMMSS Scholarship च्या शिष्यवृत्तीची रक्कम 

NMMSS Scholarship Marathi

इ. ९वी ते इ. १२वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती

NMMSS Scholarship पात्रतेचे निकष

  • पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे.
  • शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना NMMSS Scholarship योजना लागू आहे.
  • केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
  • इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास त्याला पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.
  • इयत्ता १०वी मध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यास ६० टक्के पेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट आहे)
  • इयत्ता ९ वी मधून इयत्ता  १० वी मध्ये गेलेले विद्यार्थी व इयत्ता ११ वी मधून इयत्ता १२ वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.
  • शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत  विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे.
  • शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व ते आधार कार्ड विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी जोडलेले असावे.
  • ज्या प्रवर्गातून विद्यार्थीची निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठीचा अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.
  • जर एखाद्या विद्याथ्र्यांस चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसुली करण्यात येईल.
  • कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही.
  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला जाणार

NMMSS Scholarship साठी आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे 

  • सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  • शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस. परीक्षेचे गुणपत्रक,
  • शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गतवर्षाचे (इयत्ता ९वी. १०वी, ११वी) गुणपत्रक, सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रुपये. ३,५०,००० च्या आतील उत्तपन्नाचा दाखला,
  • सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रु. २,५०,०००/- आतील उत्तपन्नाचा दाखला.
  • ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा दाखला
  • आधार कार्ड प्रत.
  • बैंक पासबुकची प्रत.

NMMSS Scholarship साठी संपर्क :-

  • शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जिल्हा परिषद.
  • संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.

हेही वाचा.