5th 8th Scholarship Marathi Details

5th 8th Scholarship Marathi (इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती योजना )

 • पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना बद्दल माहिती खालीलप्रमाणे.
 • हुशार  विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्याना ही शिष्यवृत्ती योजना उपयोगी आहे.
 • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात घेत असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालावर प्रामुख्याने गुणवत्तेनुसार शिष्यवृत्या दिल्या जातात.
 • ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याची समाधानकारक प्रगती व चांगल्या वर्तणुकीच्या आधारे पुढे चालू रहाते.
 • इयत्ता ५ वी साठी तीन वर्ष व इयत्ता ८ वी साठी २ वर्ष  शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते.
 • ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात १० महिन्यासाठी दिली जाते.
 • प्रत्येक जिल्हयाचे ग्रामीण व नागरी क्षेत्रासाठी शिष्यवृत्यांचे स्वतंत्र व ठराविक संच निर्धारित केलेले आहेत.
 • शासन निर्णय क्र. एससीएच / २००९ / ९०/९/ केपयो दि. २२/०७/२०१० अन्वये पुढीलप्रमाणे राज्यात उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व माध्यमिक शिष्यवृत्ती संच मंजूर करण्यात आले आहेत. सदरची शिष्यवृत्ती बँकेमार्फत शिष्यवृत्तीधारकाच्या खात्यावर सन २०१०-११ पासून जमा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पात्रतेचे निकष

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती खालील अटी व शतीच्या अधीन राहून देय राहील.

 • शासनमान्य (शासकीय/अनुदानित/विना अनुदानित/कायम विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील.
 • आय.सी.एस.ई. व सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी, सदर शिष्यवृत्ती परिक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी शासनच्या  अटी लागू राहतील.
 • शिष्यवृत्तीसाठी सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रचलित नियमानुसार वयाची अट राहील.
 • सदर विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेस सध्या प्रचलित असलेले विहित शुल्क आकारण्यात येईल.
 • आय.सी.एस.ई. व सी.बी.एस.ई साठी महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविणाऱ्या शाळांतील मागासवर्गीय विद्याथ्यांना असलेली परीक्षा फी माफीची सवलत या विद्याथ्यांना मिळणार नाही.
 • आय.सी.एस.ई. व सी.बी.एस.ई च्या विद्याथ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
 • सदर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास प्रथम ५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. आणि  गुणानुक्रम कळविण्यात येईल. परंतु त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही.
 • उर्वरित सर्व विद्याथ्यांना गुणपत्रके देण्यात येतील.

5th 8th Scholarship Marathi परीक्षेसाठी पात्रता

 • इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी मध्ये शिकणारे सर्व अभ्यासक्रमाच्या शाळेतील विद्यार्थी.
 • शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र होण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी किंवा विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.
 • सदर शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परिषद, पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या स्पर्धा परिक्षेच्या आधारे दिली जाईल.

परीक्षेची तारीख व दिनांक

 • शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात यावी.
 • शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जाईल.
 • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेच्या अंतिम यादी मध्ये नाव असावे.
 • शिष्यवृत्ती धारकाच्या समाधानकारक प्रगतीला अनुसरुन शिष्यवृत्ती धारकाला शिष्यवृत्ती देण्यात येते.

परीक्षेसाठी अर्ज

सदर परीक्षेसाठीचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन सादर करावेत.

5th 8th Scholarship Marathi परीक्षेसाठी शुल्क

 • शासनाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आवेदन पत्रासोबत परीक्षा शुल्क पाठविण्यात यावे.
 • अर्ज नाकारल्यास परीक्षा शुल्क संबंधितास परत करण्यात येईल.
 • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती, भटक्या जाती-विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ असेल. परंतु त्यांना आवेदन पत्राची फी भरावी लागेल.
 • आवेदन पत्र स्विकारण्याची मुदत संपल्यानंतरही परीक्षा परिषदेकडे आवेदन पत्र विलंबाने पोहचल्यास व विलंबास विद्यार्थी जबाबदार असल्यास प्रति विद्यार्थी एकत्रित रु.५०/- व विलंबास विद्यालय / संस्था जबाबदार असल्यास एकत्रित रु. १००/- विद्यालय / संस्थेकडून वसूल करून परिषदेकडून जमा करावेत.
 • सर्वसाधारण विद्यार्थी प्रवेश शुल्क रु.५०/- व परीक्षा शुल्क रु. १५०/- एकूण शुल्क रु.२००/-
 • मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थी प्रवेश शुल्क रु. ५०/- परीक्षा शुल्क रु.७५/- एकूण शुल्क रु. १२५
 • शाळा संलग्नता शुल्क रु. २००/-

5th 8th Scholarship Marathi

परीक्षेचे माध्यम

मराठी / हिंदी / गुजराथी / उर्दू / इंग्रजी / सिंधी / तेलगू / कन्नड़

5th 8th Scholarship Marathi परीक्षेचे विषय

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी)

१) पेपर १ प्रथम भाषा व गणित (गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)

२) पेपर २ रा तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी ( एकूण गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)

१) पेपर १ ला  प्रथम भाषा व गणित (एकूण  गुण ७५, वेळ ९० मिनिटे)

२) पेपर २ रा तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी ( एकूण गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)

वरील विषयांच्या प्रश्नांची काठिण्य पातळी, कठीण प्रश्न ३० टक्के, मध्यम प्रश्न ४० टक्के अशी राहील.

Pre Matric Scholarship For Minority in Marathi

वेबसाईट

5th 8th Scholarship Marathi मधून वेबसाईट वर माहिती आहे. सदर 5th 8th Scholarship Marathi ची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे.

https://www.mscepuppss.in

शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी

 • शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याने लगेचच्या वर्षी मान्यता प्राप्त प्राथमिक/ माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्याथ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.
 • शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्याच्या नंतरच्या वर्षापासून तीन / दोन वर्ष सदर शिष्यवृत्ती चालू राहील, त्यासाठी शिष्यवृत्ती धारकाला नियमित उपस्थिती चांगले वर्तन व समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल, तसेच शाळा प्रमुखाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही.
 • विद्यार्थ्याने शाळा बदल केल्यास, विद्यार्थ्यांने / पालकांने शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकामार्फत संबंधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक / योजना यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.
 • शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परवानगी शिवाय कोणीही शिष्यवृत्ती गोठवू  किंवा थांबवू शकणार नाही.
 • अशाप्रकारे आज या पोस्ट द्वारे आपण 5th 8th Scholarship Marathi बद्दल माहिती पहिली आहे.

आपण ही माहिती वाचली का?