“स्वच्छता ही सेवा” अभियान महा श्रमदान मोहिम रायगड
महा श्रमदान मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. “स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत दिनांक १ ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये श्रमदान मोहीम चे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रतिनीधी, कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी, महिला बचत गट, नागरिक, स्वयम् सेवी संस्था यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे. राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्ह्यात हे स्वच्छता श्रमदान करण्यात येणार आहे. कचऱ्याची सर्व ठिकाणे स्वच्छ केल्या नंतर संकलित करण्यात आलेला कचरा प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे. स्वच्छता श्रमदान केलेल्या ठिकाणांची माहिती केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा या पोर्टल वर भरली जाणार आहे. तसेच एक ऑक्टोंबर ला राबविलेल्या उपक्रमाचे फोटो या वेबसाईट वर अपलोड करण्यात येणार आहेत.
(pic credit swachhbharatmission.gov.in)
या ठिकाणी महा श्रमदान मोहिम रायगड राबविण्यात येणार
रेल्वे ट्रॅक आणि बस स्टँड, रस्त्याच्या कडेला (महामार्ग, राज्य रस्ते, स्थानिक रस्ते), जलकुंभ, धरणे, तलाव, नद्या, घाट, पुलांखालील, टोलनाके, बाजाराची ठिकाणे, बॅकलेन्स, गावाजवळील आणि आजूबाजूचा परिसर ठिकाणे, किल्ले स्वच्छता श्रमदान उपक्रमांतर्गत किल्ले, लेणी, पर्यटन स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालये, प्राणीसंग्रहालय व वन्यजीव क्षेत्रे, गाई निवारे, डोंगर, निवासी क्षेत्र, आरोग्य संस्था व परिसर, शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्या या ठिकाणी स्वच्छता श्रमदान अभियान राबविण्यात येत आहे.
महा श्रमदान मोहिम रायगड अंतर्गत सहभागी होणारे घटक
स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत गावांचे सरपंच व ग्रामसेवक. ग्रामविकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, युवक व मुलींचे गट, शालेय विद्यार्थी, ग्रामस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या उपस्थितीबाबत लेखी कळविण्यात आले आहे.
ग्रामस्थ घेणार हि प्रतिज्ञा
स्वच्छतेतून गावात समृध्दी येण्यासाठी मी माझे गाव अधिक स्वच्छ व सुंदर ठेवेन.
माझे गाव कचरा मुक्त ठेवेन.
उघड्यावर कुठेही घान होउ देणार नाही.
सांडपाणी आणि घन कचऱ्याचे व्यवस्थापन करेन.
ओला व सुका कचरा विलगी करण करेन.
मी प्लास्टिक मुक्ती साठी सदैव तत्पर राहिन.
माझे घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे ती पार पाडेन.
स्वच्छतेच्या कार्यात मी सदैव योगदान देईन .
गाव हागणदारी मुक्त बनविण्यासाठी आणि गावात स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्यासाठी मोलाचे सहकार्य करेन.
अश्या प्रकारची ही प्रतिज्ञा असणार आहे.
(pic credit swachhbharatmission.gov.in)
अहवाल
महा श्रमदान मोहिम रायगड या स्वच्छता श्रमदान उपक्रमाचा अहवाल 1 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत https://swachhbharatmission.gov.in या वेबसाइटवर दिला जाईल. यासाठी तालुकास्तरावर प्रवेशासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
(pic credit swachhbharatmission.gov.in)
स्वच्छतेसाठी एक दिवस एकत्र एक तास श्रमदान
रायगड मधील सर्व गावे स्वच्छ सुंदर होण्यासाठी श्रमदान मोहीम यशस्वी करावी असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शुभांगी नाखले यांनी केले आहे.
(pic credit swachhbharatmission.gov.in)