रायगड जिल्हा परिषद गणेशोत्सव ऑनलाईन स्पर्धा

“जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषद, अलिबाग”

रायगड जिल्हा परिषद गणेशोत्सव ऑनलाईन स्पर्धा २०२३

“गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा”

रायगड जिल्हा परिषद

डॉ. भरत बास्टेवाड साहेब यांचे आवाहन

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा

अलिबाग रायगड जिल्ह्यात गणेशभक्तांनी गणेशोस्तव साजरा करताना केंद्रीय प्रदूषण मंडळाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करून, उत्सव पर्यावरणास  पूरक साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात घराघरांत साजरा करण्यात येतो. देशात पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या दृष्टीने केंद्रीय प्रदूषण मंडळाने १२ मे २०२० रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. पर्यावरणास  पूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उपाययोजना

  • शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिस्थापना करावी.
  • सजावट करताना प्लास्टिक, थर्माकोलचा वापर न करता पाने, फुले व इतर नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा.
  • उत्सवात लाऊडस्पिकरचा आवाज मर्यादित ठेवावा.
  • निर्माल्य मंगल कलशात टाकून, त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी.
  • गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणविषयक जनजागृती करावी.
  • गणपती मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे.

उद्देश

  1. पर्यावरणपूरक सण उत्सव समारंभ साजरे करण्यासाठी ग्रामीण युवक, महिला बचत गट, गणेशोत्सव मंडळे, ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्था क्रिडामंडळे यांच्या सहभागातुन ग्रामस्वच्छता अभियान सर्व स्तरावर गतिमान करणे.
  2. परिसर स्वच्छता, पर्यावरण रक्षण, आरोग्याप्रति चांगल्या सवयीसाठी लोकसहभाग वाढविणे.
  3. निर्मल वातावरणात पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करणे.
  4. परिसर स्वच्छता व आरोग्याप्रति सवयीसाठी लोकसहभाग वाढविणे.
  5. गाव पातळीवरील विविध नागरिकांना सामाजिक उपक्रमासाठी प्रेरित करणे.

रायगड जिल्हा परिषद उपक्रम

रायगड जिल्हा परिषद

  • मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर.
  • पाणी व स्वच्छता व प्लास्टिक बंदीबाबत पोस्टर, बॅनर, जिंगल्स, व्हीडीओ, भजन आदीद्वारे प्रभावी जनजागृती करणे.
  • श्रमदानातून परिसर स्वच्छता वृक्ष लागवड, शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे निर्मिती
  • शाडूच्या मुर्तीचा वापर
  • जलप्रदूषण कमी करणे.
  • पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवणारे  सार्वजनिक मंडळे, विविध सामाजिक संस्था तसेच मंडळाचा गणपती नसल्यास गावात घरगुती पातळीवरील गणपती उत्सवात सहभागी होऊन या स्पर्धेत मंडळे सहभागी होऊ शकतात.
  • या स्पर्धेत सहभाग घेण्या करिता गणेश पूजनाचे रोजचे निर्माल्य गोळा करून ते निर्माल्य कलश,गोणी, पोते यात संकलन करावे व त्याचे योग्य व्यवस्थापन करणेसाठी कंपोस्टिंग करणे/सेंद्रीय खत यासाठी वापर करण्यात यावा.
  • तसेच गणपतींच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे आरास,मखर,पूजेतील प्लास्टिक वेस्टन असलेल साहित्य गोळा करून ग्रामपंचायतीमधीन संकलन केंद्रात जमा करणे अथवा मंडळाव्दारे त्याचे योग्य व्यवस्थापन करणे.
  • श्रमदानातून परिसर स्वच्छता,वृक्ष लागवड,कंपोस्ट खड्डे/शोषखड्डे निर्मिती इ. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे.

नियम

  • रायगड जिल्ह्यातील (ग्रामीण विभागातील) ग्रामपंचायत हद्दीतील मंडळे, संस्था, महिला बचत गट, ग्रामपंचायती सहभागी होऊ शकतात.
  • सहभागी मंडळानी उपक्रम केलेल्याचा दाखला ग्रामपंचायतीकडून घ्यावा.
  • कालावधी : १९ सप्टेंबर २० २३  ते  २८ सप्टेंबर २०२३. व माहिती भरण्याची लिंक २९ सप्टेंबर २०२३ रात्री १२ पर्यंत राहील.
  • सहभागी स्पर्धकांनी गुगल फॉर्म मधील माहिती भरताना त्यांचे नाव,संपर्क क्रमांक ,ईमेल आयडी व इतर माहिती अचूक नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • सदर स्पर्धेच्या पुरस्कारा करिता निवडलेल्या समितीचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल.
  • मूल्यमापन करताना कोठेही, नियम मोडलेले आढळून आल्यास, स्पर्धकाला कोणतीही पूर्व सूचना न देता या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे.

आपण हे वाचले का?

 बक्षिसे

प्रथम – ५००० रु., द्वितीय-३०००रू., तृतीय- २०००रु. प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, सहभागींना ई प्रमाणपत्र

गुगल लिंक

https://tinyurl.com/ganeshraigad2023

या गुगल लिंकवर केलेल्या उपक्रमाची माहिती / फोटो / व्हिडिओ अपलोड करणे अनिवार्य आहे.

स्पर्धेसंबंधी (online competition 2023)अधिक माहिती व IEC साहित्यासाठी खालील व्यक्तींशी संपर्क करावा.

👉श्री.सुरेश पाटील,

माहिती शिक्षण,संवाद तज्ञ,जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग,रायगड जिल्हा परिषद

(संपर्क क्रमांक-9881712585)

👉श्रीम नेहा थळे ,माहिती शिक्षण संवाद व समानता सल्लागार संपर्क- 8888875024

 

(online competition 2023) स्पर्धा समन्वयक व तांत्रिक समन्वयक

👉श्री जयवंत गायकवाड जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक- संपर्क 9422495846

👉श्री.राजेंद्र दत्तात्रेय अंबिके

उपशिक्षक,जि.प.शाळा नेणवली,ता.सुधागड

(संपर्क क्रमांक –9326636080)

👉समीर रब्बानी काजी सय्यद ,उपशिक्षक,राजिप शाळा वडघर उर्दू ,ता.पनवेल जिल्हा रायगड

(संपर्क क्रमांक –7385390197)

 

श्रीम. शुभांगी नाखले

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

(पा. व स्व.) रायगड जिल्हा परिषद

श्री. राजेंद्र भालेराव

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

(ग्रा.पं.) रायगड जिल्हा परिषद

श्रीम. प्रियदर्शिनी मोरे

प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

रायगड जिल्हा परिषद

श्री. सत्यजित बढे

अति. मु. का. अ. रायगड जिल्हा परिषद

डॉ. भरत बास्टेवाड

मुख्य कार्यकारी अधिकारी

रायगड जिल्हा परिषद

स्वच्छता हि सेवा अभियान अंतर्गत

पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव ऑनलाईन स्पर्धा २०२३