सर्वाना माहिती असायला हव्या अशा उपयुक्त किचन टिप्स
गृहिणीचे आवडते ठिकाण म्हणजे किचन होय. कारण सर्वात जास्त वेळ त्यांना किचन मध्ये घालावा लागतो. अशा वेळेस जर काम करताना काही टिप्स जर त्यांनी लक्षात घेतल्या तर त्यांना आपले काम सोपे करता येणार आहे. म्हणूनच या पोस्ट द्वारे आपणास काही महत्वाच्या किचन टिप्स बद्दल माहिती मिळणार आहे.
स्वच्छते बाबत किचन टिप्स
- स्वयंपाक घर नेहमीच स्वच्छ असावे.
- किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा. ज्यामुळे किचन मध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत.
- रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी.
- हात स्वच्छ धुताल्या नंतरच कामाला सुरुवात करावी.
- दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात.
- किचन मधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठीच आपण लिक्विड चा वापर करावा.
- आपल्या घरामधील तुपाचे भांडे, तेलाची बॉटल, किंवा किटली या भांड्याच्या खाली त्याच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात. किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे. त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत. आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो.
- किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा.
- आठवड्यातून एकदा तो डबा धुवून उन्हात वाळवावा. ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत.
- किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका.
भाजीपाला किचन टिप्स
- भाज्या चिरण्याआधीच धुऊन घ्याव्यात.
- चिरल्यानंतर त्या धुऊ नयेत.
- चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्वाचे शरीरास आवशयक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात.
- भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो.
- हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजवाव्यात त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे वाफेबरोबर निघुन जाणार नाहीत.
- कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात.
कडधान्य किचन टिप्स
- तुर डाळ उन्हात वाळवु नये.
- धुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी. त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही
- वाटाणा, मटकी,हरभरा यांना बोरीक पावडर लावून ठेवावी.
- आपणास केमिस्ट दुकानात बोरीक पावडर सहज उपलब्ध होते.
- डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यांत सुकलेला कडुनिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही.
- कडधान्य नीट निवडून घ्यावे, अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता असते. यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो.
- कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत. यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे किटक कडधान्या भोवती येणार नाहीत.
दुध किचन टिप्स | Milk Kitchen Tips In Marathi
- गाईचे दूध फाटल्यानंतर त्या मधून निघालेले पाणी टाकून देऊ नका.
- त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांची कणीक मळताना करा.
मसाले किचन टिप्स | Spices Kitchen Tips In Marathi
- स्वयंपाक घरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत.
- तीन किंवा सहा महिन्याचेच करावे त्यामुळे मसाले स्वाद कमी होत नाही.
- आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो.
फ्रीज किचन टिप्स मराठी मध्ये | Refrigerator Kitchen Tips In Marathi
- अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते.
- त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही.
- हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते.
- खसखस हि फ्रिजमध्येच ठेवावी.
- भगर सुद्धा फ्रिजमध्येच ठेवावी.
- बेकिंग सोडा वापरुन झाला कि लगेच तो फ्रिज मध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो.
- पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी, ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही.
- नेहमी फ्रिजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रिजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा.
- फ्रिजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रिजमध्ये ठेवावेत, त्यामुळे फ्रिज मधील वास निघून जाईल.
इतर महत्वाच्या टिप्स | Other Kitchen Tips In Marathi
- नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा.
- चुकून बिघडलाच तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो.
- कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत.
- लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे.
- पोहे करत असताना त्याचा लगदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जरआपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत.
- महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते.
- भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात एक चमचा बेसन पीठ टाका त्यामुळे ग्रेव्ही ला ला छान स्वाद येईल.
- कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखी छान होईल.
- पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते.
- लसूण सोलणे हे सर्वात अवघड कामवाटते. मात्र लसून लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकण्याच्या डब्यात घालून हलवा. त्यामुळे लसूणाच्या पाकळ्या निघून जातील.
किचन टिप्स आणि काही प्रश्न
प्रश्न: किचन मध्ये स्वच्छ का असायला हवी ?
स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे या उक्तीप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी किचन मध्ये स्वच्छता असायला हवी.
प्रश्न: किचन मध्ये टिप्स का वापराव्यात ?
आपला वेळ आणि श्रम वचवण्यासाठी किचन मध्ये टिप्स वापरण्यात याव्यात.
प्रश्न: स्वयंपाकघरात काय ठेवू नये?
मळलेले पीठ जास्त वेळ स्वयंपाकघरात ठेवू नये.
सारांश
तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर आता तुम्ही या टिप्स वापरून पहा आणि तुमचे काम आणखी सोपे करा आणि आपला किचन मधील कामातील वेळ आणि श्रम वाचवा.