Ladki Bahin Yojana Online Apply | लाडकी बहिण योजना संपूर्ण माहिती | best marathi Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024

ही योजना फक्त  ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब महिला आहेत त्या महिलांसाठी आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या लेखामध्ये आपण  पुढील माहिती पाहणार आहोत. आपण  या योजनेत अर्ज कसा करू शकता? अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील?  Ladki Bahin Yojana उद्देश काय आहे? यासाठी पात्रता काय आहे?  यासाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात?

Ladki Bahin Yojana उद्देश

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या महिलांना प्रतिमहा १५०० रुपये आर्थिक मदत करून महिलांचे सशक्तीकरण करणे हा आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी प्रमाण पत्र
  • मोबाईल नंबर
  • मतदान कार्ड
  • स्वघोषणापत्र

Ladki Bahin Yojana एका दृष्टीक्षेपात

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य बजट 2024
योजना राज्य महाराष्ट्र
लाभ किती मिळेल प्रत्येक महिन्याला १५०० रुपये
लाभार्थी कोण महाराष्ट्र राज्यातील महिला
कोणी सुरु केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वयोगट १८ वर्ष ते ६० वर्ष
रक्कम कोठे मिळेलआधार लिंक असलेल्या बँक खात्यात

Ladki Bahin Yojana स्वरुप :-

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक
केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेचे लाभार्थी :

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रताः-

माझी लडकी बहीण योजना 2024 साठी अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी, अर्जदारांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहेत.

(१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
(२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
(३) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
(४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
(५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्रता :-

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
  • सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

Ladki Bahin Yojana अर्ज

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana चा लाभ घेण्यासाठी अर्ज येथे क्लिक करून डाउनलोड करा.

Ladki Bahin Yojana App link

याठिकाणी क्लिक करून तुम्ही लाडकी बहीण योजनेचे app डाउनलोड करू शकतात.

आपण ही माहिती वाचली का? लेक लाडकी योजना

Ladki Bahin Yojana शासन निर्णय

लाडकी बहीण योजना शासन निर्णय