NMMSS Scholarship (National Means-Cum Merit Scholarship Scheme)
शिक्षण कार्यमंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे.
NMMSS Scholarship बद्दल थोडक्यात
- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMSS ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन २००७-०८ या वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता ८वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
आयोजन
- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे मार्फत केले जाते.
- इयत्ता ८वी मध्ये शिकत असलेल्या शिष्यवृत्ती निकषानुसार पात्र विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षा घेतली जाते.
- सदर विद्याथ्यांना इयत्ता ७ वी मध्ये किमान ५५ टक्के गुण असावे. (SC ST यांना गुणामध्ये ५ टक्के सवलत)
- सदर परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराथी, तेलगु, सिधी व कन्नड या माध्यमातून घेतली जाते.
- सदर परीक्षेचे शुल्क १०० रु व शाळा संलग्नता शुल्क २०० रु आकारले जाते.
- सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा इ. ८वी पर्यंतचा राज्यशासनाचा आहे.
NMMSS Scholarship पेपर
- पेपर १ बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)
- पेपर २ शालेय विषयक क्षमता चाचणी (SAT) – (सामान्य ज्ञान ३५ गुण सामाजिक शास्त्र ३५ गुण, गणित २० गुण)
- दोन्ही पेपर साठी प्रत्येकी ९० गुण व वेळ ९० मिनीटे
- सदर परीक्षेमधून राज्याला ठरवून दिलेल्या (११६८२) कोटयानुसार निवडलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत तयार केली जाते.
- शासन निर्णय क्र. २० ऑगस्ट, २०१८ पासून परीक्षेत निवड झालेल्या विद्याथ्यांना इ.१ ते इ.१२ वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती मिळते.
NMMSS Scholarship परीक्षाचे स्वरूप
- सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका सोबत देण्यात येते.
- विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येते. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातात.
- प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतात.
- योग्य पर्यायाचे वर्तुळ निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे असते.
- पेन्सिलचा वापर केलेली,अर्धी,अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जात नाही.
- एकापेक्षा जास्त वर्तुळात नोंदविलेली उत्तरे, चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे, व्हाईटनर किंवा खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जात नाही.
अंमलबजावणी
- सन २०१७.१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या वेबसाईटवरून करण्यात येत आहे.
- विद्यार्थ्याने नवीन व नूतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने भरलेले अर्ज शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर सादर करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी राज्य शासनाच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे.
- तसेच पात्र लाभार्थ्याना शिष्यवृत्तीचा लाभ Public Finance Management System PFMS मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा केली जाते.
NMMSS Scholarship चे उद्दिष्टे
- इयत्ता ८वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्याण्यांचा शोध घेऊन बुध्दीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे.
- विद्याथ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे.
- आर्थिक मागासलेपणा या करणामुळे हुशार विद्यार्थ्याची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती थांबावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
NMMSS Scholarship च्या शिष्यवृत्तीची रक्कम
इ. ९वी ते इ. १२वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती
NMMSS Scholarship पात्रतेचे निकष
- पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे.
- शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना NMMSS Scholarship योजना लागू आहे.
- केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
- इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास त्याला पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.
- इयत्ता १०वी मध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यास ६० टक्के पेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट आहे)
- इयत्ता ९ वी मधून इयत्ता १० वी मध्ये गेलेले विद्यार्थी व इयत्ता ११ वी मधून इयत्ता १२ वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे.
- शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व ते आधार कार्ड विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी जोडलेले असावे.
- ज्या प्रवर्गातून विद्यार्थीची निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठीचा अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.
- जर एखाद्या विद्याथ्र्यांस चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसुली करण्यात येईल.
- कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही.
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला जाणार
NMMSS Scholarship साठी आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे
- सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस. परीक्षेचे गुणपत्रक,
- शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गतवर्षाचे (इयत्ता ९वी. १०वी, ११वी) गुणपत्रक, सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रुपये. ३,५०,००० च्या आतील उत्तपन्नाचा दाखला,
- सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रु. २,५०,०००/- आतील उत्तपन्नाचा दाखला.
- ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा दाखला
- आधार कार्ड प्रत.
- बैंक पासबुकची प्रत.
NMMSS Scholarship साठी संपर्क :-
- शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जिल्हा परिषद.
- संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.