singham movie |सिंघम 3 मुव्हीचा फर्स्ट लूक समोर | “चाहते खूप उत्सुक”

Singham Movie ३ चा फर्स्ट लूक समोर

बॉलिवूडमधील अजय देवगण चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिंघम ३’ ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये थिएटरमध्ये आपल्याला प्रदर्शित झाल्याचा दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटातील स्टार्सचा फर्स्ट लूक समोर आला आहे. आता ‘Singham Movie 3’ चित्रपटाचा प्रमुख हिरो अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याची झलक दाखवली आहे, ज्याला पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत. अजय देवगणचा ‘सिंघम 3’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर कसा आहे ते पाहूया.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगण आणि सिंघम चित्रपट

बॉलिवूड इंडस्ट्री मधील लोकप्रिय स्टार अजय देवगणने ‘सिंघम’ चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. Singham Movie च्या निमित्ताने आता अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या सर्व चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी येत आहे. अजय देवगणने मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘सिंघम 3’ या चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर शेअर केला. ‘सिंघम 3’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये अजय देवगण सिंघम अवतारात दिसत आहे. त्याचबरोबर अजय देवगणसोबत सिंहाची सावलीही दिसत आहे. अजय देवगणने या पोस्टरसोबत लिहिले आहे, ‘तो पराक्रमी आहे, तो शक्ती आहे, तो धोका आहे, तो ताकद आहे, मग सिंघम गर्जना करेल!’ अजय देवगणच्या पोस्टरला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

पहिल्या दोन चित्रपटाबद्दल

रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिरीज मधील प्रथम चित्रपट ‘सिंघम’ (singham movie) हा चित्रपट 2011 मध्ये तर दुसरा ‘सिंघम रिटर्न्स’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे . आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच ‘सिंघम 3’ येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण तसेच दीपिका पदुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ हे कलाकार दिसणार आहेत. तसेच सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमार आणि  सिम्बा म्हणजेच रणवीर सिंग या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘सिंघम 3’ चित्रपटातील सर्व स्टार्सचे फर्स्ट लूक समोर आले आहेत ज्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ‘सिंघम 3’ हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच चागली कामगिरी करणार आहे.

रोहित शेट्टी यांची पोस्ट

Sher aatank machaata hai,
aur zakhmi sher tabaahi!
Everyone’s favourite cop,
BAJIRAO SINGHAM IS BACK!…

SINGHAM AGAIN…

आपण हे बेस्ट सस्पेन्स फुल बॉलिवूड चित्रपट पहिले का ?