सेवा पुस्तकाची हि(service book) माहिती असायलाच हवी
service book बाबत महत्वाचे मुद्दे
- महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 मधील नियम 36 परिशिष्ट – 4 नुसार सेवापुस्तकाचा (service book) नमुना विहित करण्यात आला आहे.
- मुंबई वित्तिय नियम, 1959 नियम 52 परिशिष्ठ-17 अन्वये सेवा पुस्तक है अभिलेख जतनाच्या अ वर्गात मोडते याचाच अर्थ ते प्रदिर्घ कालावधीपर्यंत जतन करुन ठेवणे आवश्यक असल्याने ते सुस्थितीत ठेवण्याची सुरवातीपासूनच दक्षता घेणे आवश्यक आहे.
- सेवा पुस्तक हे त्या कर्मचाऱ्याचा सेवेचा खूप महत्वाचा अभिलेख आहे. सेवापुस्तक (service book) अपूर्ण असेल/नसेल/काही आक्षेप असतील तर कर्मचाऱ्यास / अधिकाऱ्यास निवृत्ती नंतरचे देय लाभ मिळण्यास अडचणी येतात.
- स्वतचे मूळ व दुय्यम सेवापुस्तक (service book) प्रत्येकी 6 ते 7 पुस्तकांचे एकत्रीत बायडींग करून तयार करून घ्यावे व त्याला पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत पृष्ठ क्रमांक देण्यात यावेत
- प्रत्येकाने आपले मूळ / दुय्यम सेवा पुस्तक अदयावत सुस्थितीत आहे व त्यात सर्व आवश्यक नोंदी घेतल्या असल्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- अधिकारी किंवा कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर त्यांचे मुळ सेवापुस्तक डायरेक्ट त्यांच्या ताब्यात देऊ नये. सदरचे सेवापुस्तक एका कार्यालयाकडुन दुसऱ्या कार्यालयाकडे योग्य मार्गानेच पाठवावे. (सार्वजनिक बांधकाम विभाग परिपत्रक 2.30/01/2019)
- निवृत्तीवेतनाची प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठवितानाच्या अर्जात निवृत्त कर्मचाऱ्याचे नाव सेवापुस्तकातील पहिल्या पानावरील नोंदी प्रमाणेच असण्याची दक्षता घेण्यात यावी. (वित्त विभाग परिपत्रक 10/01/2014)
- सेवा पुस्तक हा सेवा हा अतिशय महत्वाचा दस्तावेज शेवट पर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे.
- स्वता: कर्मचा-याने याबाबत दक्ष राहुन सेवा पुस्तिकेकडे आपले लक्ष देणे गरजेचे आहे.
- याबाबत चा त्रास मग जेव्हा सेवानिवृत्ती जवळ येते त्यावेळेस जाणवतो.
- सेवानिवृत्ती वेळेस महत्वाच्या नोंदी करायच्या असतील तर ते रेकार्ड सापडत नाही.
सेवा सेवापुस्तकाचे service book उपविभाग
सेवापुस्तक (service book) हे प्रामुख्याने 5 उपविभागात विभागले आहे.
- पहिले पान
- नियुक्ती तपशिल
- रजेचा हिशोब
- अर्हताकारी सेवेशी प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशिल
- सेवा पडताळणी
सेवा पुस्तकातील service book महत्वाच्या नोंदी
पहिल्या पानावरील नोंदी
- जन्म तारीखेची नोंद:- जन्म तारीखेची नोंद घेताना जन्म तारीखेची कशाच्या आधारे पडताळणी केली त्याचा उल्लेख असावा. जन्म दिनांक अंकी व अक्षरी लिहुन त्यावर कार्यालय प्रमुखाने स्वाक्षरी करावी.
- धर्म व जात लिहीताना आपली मुळ जात लिहावी. तसेच आपण ज्या प्रवर्गातुन सेवेत लागलो त्याचाही कंसात उल्लेख करावा.
- नोकरी लागल्यानंतर पूर्वी घेतलेल्या शैक्षणिक पात्रतेची नोंद सेवापुस्तकात घेऊन त्यात वाढ झाल्यास त्या प्रमाणपत्राच्या उल्लेखासह ती नोंद साक्षांकित करावी.
- वडिलांचे नाव व मुळ राहण्याचे ठिकाण
- वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंद
प्रथम नियुक्तीनंतरच्या नोंदी
- प्रथम नियुक्ती आदेश
- प्रथम रुजु दिनांक
- प्रथम नियुक्ती स्थायी किंवा अस्थायी ची नोंद व नियुक्तीचा प्रवर्ग, पदनाम, व वेतन श्रेणी यांची नोंद
- स्वग्राम घोषणापत्राची नोंद
- गट विमा योजना सदस्य नोंद असावी व कपात केलेली रक्कम किती त्याचा ही उल्लेख असावा
- अपघात विमा योजना नोंद व विमा कपात रक्कम
- मराठी भाषा परिक्षा पास किंवा सुट असेल तर त्या आदेशाची नोंद
- हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण किंवा सुट आदेश नोंद
- संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण झाल्याची/ सुट नौद
- चारित्र्य पडताळणी नोंद (विभाग प्रमुखाच्या सहमतीने)
- स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद
- जात पडताळणी बाबतची नोंद
- टायपिंग परिक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
- भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक याची नोंद
- DCPS / NPS खाते क्रमांक नोंद
- विभागीय परिक्षा उत्तीर्ण अथवा सुटीची नोंद
- परिविक्षाधीन कालावधी समाप्त झाल्यानंतर नियुक्ती नियमित केलेल्या आदेशाची नोंद
- छोटे कुटुंब प्रमाणपत्र
- अपंगांसाठी राखीव पदावर नियुक्ती झालेली असल्यास अपंगत्वाबाबतची विहित वैधता प्रमाणपत्र नोंद
- निष्ठेचे शपथपत्र कर्मचा-याकडून घेऊन ते साक्षांकित करून सेवाभिलेख्यात / सेवापुस्तकात चिकटावे- (शासन परिपत्रक सा.प्र विभाग दि.11.9.2014 व दि.6.10.2015)
नियमित बाबी किंवा घटना
- वार्षिक वेतनवाढ.
- वार्षिक वेतनवाढ मंजुर केल्यानंतर रकाना क्रमांक 8 मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी.
- बदली झाली असल्यास बदली आदेश, कार्यमुक्तीचा आदेश, नवीन पदावर रुजु झाल्याचा दिनांक, इत्यादी बाबीची नोंद जेथे पदग्रहण कालावधी अनुज्ञेय असेल तेथे पदग्रहण अवधीची नोंद.
- पदोन्नती / पदावन्नतीच्या आदेशाची नोंद.
- पदोन्नती / पदावन्नतीच्या पदावर रुजु दिनांकाची नोंद.
- पदोन्नती / पदावन्नतीच्या पदाच्या वर्गाच्या वेतनश्रेणीची व वेतन निश्चितीच्या आदेशाची
- वेतन निश्चितीसाठी विकल्प दिला असल्यास त्याची नोंद.
- पदोन्नती, वेतन आयोग, कालबध्द पदोन्नती, एकस्तर पदस्थापना याबाबत वेतन निश्चिती केल्याची नोंद.
- ज्या वेळेस वेतन श्रेणीत बदल झाला असेल त्या वेळी वेतन आयोगानुसार वेतन पडताळणी पथकाकडुन करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची नोंद.
- नियम 1978 नुसार वेतन पडताळणी पथकाकडुन वेतन निश्चिती तपासणी झालेली नसल्यास शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 20-08-1986 नुसार कार्यालय प्रमुखाने नोंदविलेल्या प्रमाणपत्रकाची नोंद.
- एखादया पदावरील नियुक्ती तदर्थ/तात्पुरची स्वरुपाची असल्यास त्या आदेशाची नोंद व ती नियुक्ती नियमित केली असल्यास त्याची नोंद.
- अनिवार्य प्रशिक्षण तसेच सेवार्गत प्रशिक्षणाची नोंद
- पायाभूत प्रशिक्षण नोंद
- विदेशात प्रशिक्षणासाठी पाठविले असल्यास त्याची नोंद.
विविध नामनिर्देशन
- गट विमा योजना नामनिर्देशन
- भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन
- निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद
- मृत्य नि सेवा उपदानाची नामनिर्देशनाची नोंद
- DCPS/NPS नामनिर्देशनाची नोंद
- अपघात विमा योजना नामनिर्देशनाची नोंद
- कुटुंब प्रमाणपत्र
सेवापुस्तकात (service book) आवशयक असणारे महत्वाचे दस्तावेज
शक्यतो सर्व महत्त्वाचे आदेश/प्रमाणपत्र सेवापुस्तकात (service book) लावावे म्हणजे ते तात्काळ उपलब्ध होतात.
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- खालील प्रमाणेची विविध नामनिर्देशन GIS GPF Pension DCRG NPS DCPS कुटुंब प्रमाणपत्र अपघात विमा
- वेतन निश्चिती
- विकल्प (option) Form.
- ज्यादा रक्कम अदायगी वसुलीचे हमीपत्र
- वेतन आयोग फरकाच्या हप्तेचा तपशिल, तसेच फरक प्रदान रकमेचा व्हावचर क्रमांक व दिनांक
- चारित्र्य प्रमाणपत्र
- MSCIT / तत्सम प्रमाणपत्र
- नाव बदललेले असले तर त्याबाबतचे राजपत्र
सेवा पुस्तकातील (service book) हे आक्षेप येऊ शकतात
- सेवापुस्तकातील (service book)रजा लेखा अपूर्ण असणे.
- सेवापुस्तकातील रजा लेखा चुकीचा असणे.
- सेवापुस्तकात मराठी/ हिंदी भाषा परिक्षाची सुट या आदेशाची नोंद नसणे.
- वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे.
- वेतन आयोगाची वेतननिश्चिती मधील आक्षेप.
- चारित्र्य पडताळणी झाल्याची नोंद नसणे.
- स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे.
- शासन निर्णय वित्त विभाग दि.05.05.2010 नुसार आवश्यकत्या प्रकरणात वेतननिश्चिती सुधारीत न केल्यामुळे येणारी वसुली व सदर वसुलीची नोंद सेवापुस्तकात न घेणे.
- स्वग्राम घोषित केल्याची नोंदी नसणे.
- गटविमा योजना वर्गणी कपात रक्कमांची नोंद नसणे
- कार्यालय प्रमुखाने प्रत्येक 5 वर्षांनी पहिल्या पानावरील नोंदी प्रमाणित न करणे.
- सेवा पडताळणी नोंद नसणे,
- शा.नि. वित्त विभाग दिनांक.01.09.2015 नुसार सुधारित वेतन संरचनेमध्ये वार्षिक वेतनवाढ मंजूर करताना कर्मचारी यांचे वेतन कमाल टप्याच्या पुढे जात असेल तर अशा प्रकरणी ते वेतन त्या कमाल टप्पावर सिमीत न करणे
- सेवा प्रवेशोत्तर परिक्षा विहित मुदतीत उत्तीर्ण न होता वेतनवाढी देणे.
- संगणक अर्हता परीक्षा दिलेल्या दिनांकास उत्तीर्ण न झाल्याने वेतन वाढींचे अति प्रदान झाले असेल तर
- पदोन्नतीची वेतननिश्चीती चुकीच्या वेतनावर करणे
सारांश
अशाप्रकारे सेवा पुस्तकाबाबत सर्व नोंदी पूर्ण असाव्यात. जेणेकरून आपणास सेवानिवृत्ती वेळेस होणार त्रास टाळता येईल .