तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत?
तुमच्या नावाच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड आहेत? हे तुम्हाला माहीत आहे का! जर नसेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा एखाद्या दिवशी तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. तुमच्या आयडीवर किंवा नावावर किती सिम कार्ड चालू आहेत हे शोधणे सोपे आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या online ते चेक करू शकतात व तुमच्या आयडीवर किती सिम चालू आहेत, हे फक्त 2 मिनिटांत तुम्ही जाणून घेऊ शकतात. तुमच्या नावावर सक्रिय असणाऱ्या सिम पैकी कोणतेही सिम तुम्ही वापरत नसाल किंवा तुम्हाला वाटत असेल की ते तुम्ही किंवा तुमचे कुटुंब वापरत नाही, तर तुम्ही ते सिम येथून सहजपणे बंद करू शकता. या सर्व गोष्टीची माहिती आपण या पोस्ट द्वारे पाहणार आहोत.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे का माहिती असायला हवे?
- आजकाल सायबर गुन्ह्यांच्या सर्वच घटना मोबाईल फोनच्या माध्यमातून घडत आहेत हे तुम्हाला माहीत आहे.
- अशा परिस्थितीत, कोणतीही घटना घडली की, पोलिस प्रथम त्या मोबाइल क्रमांकाच्या मालकाचा शोध घेतात आणि सिम घेताना वापर केलेला आयडी प्रुफ कोणता वापरला आहे हा शोध पोलीस घेतात.
- या नुसार पोलीस सिम मालकाला पकडतात.
- आता तुमच्या नकळत तुमच्या नावावर कोणतेही सिमकार्ड घेतले असेल आणि त्या सिमकार्डच्या माध्यमातून कोणताही अपघात किंवा कोणताही गुन्हा घडला असेल, तर पोलिस तुमच्यापर्यंत पोहोचतील.
- तुम्ही गुन्हा केला नाही म्हणजे तुम्ही स्वतःला निर्दोष आहोत हे सिद्ध करू शकतात.
- पण तोपर्यंत कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला 1 किंवा 2 दिवसांपर्यंत कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी काळजी घेणे फार महत्वाचे आहे.
कसे चेक करा तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत?
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे चेक करण्यासाठी DoT ने (TAFCOP) नावाचे एक पोर्टल लाँच केलं आहे. तुमच्या मोबाईलमधील किंवा कॉम्पुटर वर कोणतेही ब्राउझर चालू करा. आणि ही वेबसाइट उघडा.
https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/
त्यानंतर तुम्हाला अशी स्क्रिन दिसेल
या ठिकाणी तुम्हाला तुमचा तुमच्याकडे सद्यस्थितीत चालू असलेला मोबाईल नंबर नमूद करून Captcha टाकायचा आहे. नंतर Validate Captcha वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही याठिकाणी दिलेल्या नंबर वर एक OTP येईल. तो आलेला OTP टाकून लॉगीन या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रिन दिसेल.
या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे दिसेल.
आपल्या नावावर अनोळखी नंबर असल्यास काय काय करावे?
लॉगीन झाल्यानंतर आलेल्या स्क्रिन वर आपणास आपण वापर करत नसलेला नंबर दिसला तर आपण आपण तो नंबर निवडून NOT MY NUMBER या वर क्लिक करावे.
संचार साथी पोर्टल बद्दल थोडक्यात
- संचार साथी पोर्टल हा मोबाईल ग्राहकांना सक्षम करण्यासाठी, त्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि सरकारच्या नागरिक केंद्रित उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दूरसंचार विभागाचा एक नागरिक केंद्रित उपक्रम आहे.
- संचार साथी नागरिकांना त्यांच्या नावाने जारी केलेले मोबाईल कनेक्शन जाणून घेण्याची परवानगी देऊन, त्यांना आवश्यक नसलेले कनेक्शन बंद करून, हरवलेले मोबाईल फोन ब्लॉक/ट्रेस करून आणि नवीन/जुना मोबाईल फोन खरेदी करताना वास्तविकता तपासण्याची परवानगी देऊन सक्षम करते.
- संचार साथी मध्ये CEIR, TAFCOP, KYI, RICWIN इत्यादी विविध मॉड्यूल आहेत.
- याशिवाय, कीप युवरसेल्फ अवेअर सुविधा अंतिम वापरकर्त्याची सुरक्षा, दूरसंचार आणि माहिती सुरक्षिततेशी संबंधित विविध पैलूंवर नवीनतम अद्यतने आणि जागरूकता सामग्री प्रदान करते.
सिम कार्ड बद्दल काही महत्वाचे प्रश्न व उत्तरे (FAQ)
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? या अनुषंगाने काही प्रश्न व उत्तरे खालील प्रमाणे.
1.एका आयडीवर किती सिम वापरता येतील?
एका आयडीवर फक्त 9 सिम कार्ड वापरता येतील.
2. DOT चा पूर्ण अर्थ काय आहे?
Department of Telecommunications
3. मी एका आधार कार्डवर 2 एका कंपनीचे सिम घेऊ शकतो का?
होय, तुम्ही एका आधार कार्डवर 2 एका कंपनीचे सिम घेऊ शकतात.
4. १८ वर्षाच्या खालील वय असणाऱ्या मुलास सिम कार्ड मिळू शकते का?
भारतात सिम खरेदी करण्यासाठी किमान वय १८ वर्षे आहे. ती सर्वांसाठी आवश्यक अट आहे.
5. सिम कार्ड कसे निष्क्रिय करावे?
कस्टमर केअरला कॉल करा आणि कार्ड ब्लॉक करायला सांगा
6.मी माझे जिओ सिम कायमचे कसे ब्लॉक करू?
Jio च्या ग्राहक सेवा क्रमांक 199 वर कॉल करा आणि तुमचे Jio सिम कार्ड ब्लॉक करण्यासाठी विनंती करा.
अशाप्रकारे आज आपण तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत याबद्दल माहिती घेतली आहे.