हे करा ॲसिडीटी आणि पित्त झाल्यावर घरगुती उपाय 4 बेस्ट उपाय Best marathi

पित्त झाल्यावर घरगुती उपाय

पित्त होण्याची अनेक कारणे आहेत व पित्त झाल्यावर घरगुती उपायाद्वारे आपण हे प्रमाण कमी करू शकतोत आणि पित्तापासून आराम मिळवू शकतोत.

ॲसिडीटी वारंवार का होते?

आज अनेकदा लोक ॲसिडिटीच्या समस्येने त्रस्त असतात. ही एक अशी समस्या आहे जी तुम्हाला वारंवार त्रास देऊ शकते. अशा परिस्थितीत, ॲसिडिटीच्या समस्येने त्रास होणार नाही याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा, त्याची कारणे जाणून घेऊन ते आचरणात आणले पाहिजेत.  चला तर मग, आज या लेखात जाणून घेऊया की ॲसिडिटी का वारंवार होते. तसेच पित्त झाल्यावर घरगुती उपाय काय केले जावे या बद्दलची माहिती सविस्तर पाहूया.

ॲसिडिटी आणि गॅसची कारणे

1.आंबट पदार्थ

आंबट पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने ॲसिडिटी होऊ शकते. वास्तविक, आंबट फळे जसे की संत्रा आणि हंगामी फळे इत्यादींचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने दिवसभर ॲसिडिटी होऊ शकते. हे खरेतर पोटाचे ऍसिड पीएच खराब करते आणि वारंवार ऍसिडिटी होऊ शकते.

2.चुकीच्या वेळी दूध पिणे

चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने ॲसिडिटी होऊ शकते. जसे कि, रोज रात्री किंवा सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने आम्लपित्त होऊ शकते. वास्तविक, ज्या लोकांचे चयापचय मंद होते त्यांना दूध लवकर पचत नाही. त्यामुळे अशा लोकांना ॲसिडिटी होऊ शकते.

3.गोड आणि मसालेदार मिश्रण

हे सर्वात वाईट अन्न मिश्रण आहे. गोड आणि मसालेदार मिश्रणामुळे ऍसिडिटी होऊ शकते. यामुळे चयापचय बिघडते आणि छातीत जळजळ होते. यामुळे गॅसची समस्या आणि मधूनमधून छातीत जळजळ होऊ शकते.

4.सोडा आणि कोल्ड्रिंक्स

सोडा आणि कोल्ड्रिंक्स प्यायल्याने ॲसिडिटी होऊ शकते. यामुळे शरीरातील पाचक एंझाइम खराब होतात आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होऊ देत नाही. याशिवाय, ही पेये पोटाच्या पीएचमध्ये अडथळा आणतात, ज्यामुळे अधूनमधून गॅस आणि ऍसिडिटी होऊ शकते.

5. जेवणाच्या अनियमित वेळा

आजच्या धावपळीच्या युगात जेवणाच्या बाबतीत दुर्लक्ष झालेले दिसून येते. त्यामुळे अनियमित वेळेवर आहार घेतल्याने गॅस आणि ऍसिडिटी होऊ शकते.

6. जागरण  

झोप ही शरीरासाठी अतिशय आवश्यक असणारी गोष्ट आहे. व्यवस्थित झोप न झाल्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते त्यापैकी एक म्हणजे ऍसिडिटी हा आजार आहे. जागरण झाल्यामुळे ऍसिडिटी ची समस्या वाढण्यास मदत होते.

पित्त झाल्यावर घरगुती उपाय

पित्त झाल्यावर घरगुती उपाय आपण प्रथम करून पहिले पाहिजेत. आणि त्याद्वारे जर आराम मिळाला नाही तर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. पित्त झाल्यावर घरगुती उपाय काय करावेत जे जाणून घेऊयात.

१. जेवणानंतर गुळ

पित्त झाल्यावर घरगुती उपाय

जेवण केल्या नंतर आपण गूळ खाल्यामुळे आपली पचनक्रिया चांगली होते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. याचे सेवन असेल तर पचनसंस्था मजबूत होते. पचन क्रिया सुलभ होण्यासाठी गुळाचा आहारात समावेश असावा. असे केल्याने गॅस, अपचन, मळमळ यासारख्या तक्रारींपासून आराम मिळतो. हा सर्वात प्रथम पित्त झाल्यावर घरगुती उपाय करणे आवश्यक आहे.

२. सकाळी 2 ग्लास कोमट पाणी

पित्त झाल्यावर घरगुती उपाय

कोमट पाणी पिल्यामुळे आपले पोट साफ होते. अपचन आणि ऍसिडिटीच्या बाबतीत, आपण कोमट पाण्याचे सेवन करू शकता. हा आपण पित्त झाल्यावर घरगुती उपाय करावा.

३.तुळशीचे पान

तुळशी

तुळशीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. तुळशी मधील असणाऱ्या घटकामुळे शरीराला अनेक फायदे होत असतात. त्यामुळे तुळशीचे पान आपण रोज सेवण केले पाहिजे. तुळशीच्या पानाच्या सेवनामुळे आपणास ऍसिडिटी व पित्ताच्या त्रासापासून मुक्ती मिळेल.

४.लवंग

लवंग

लवंग तोंडात ठेवून चघल्यामुळे  पित्ताचा त्रास नाहीसा होण्यास मदत होते. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहेत ज्यात चमत्कारिक औषधी गुणधर्म आहेत. त्यापैकी एक म्हणजे लवंग. लवंग आकाराने खूप लहान असू शकतात पण त्यांचे फायदे तितकेच मोठे आहेत. लवंगात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्यात जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मँगनीज, कार्बोहायड्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. लवंग अनेक प्रकारच्या आजारांवरही खूप फायदेशीर आहे.

सर्दी खोकल्यावर हे करा घरगुती उपाय ➡

सारांश

पित्त झाल्यावर घरगुती उपाय करत असताना काही टिप्स लक्षात असणे आवश्यक आहे.

रिकाम्या पोटी आंबट पदार्थाचे सेवन करणे टाळावे.

नियमितपणे वेळच्यावेळी जेवण करावे.

ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास होत असेल अशा व्यक्तीने दुधाचे पदार्थ व दूध घेणे टाळावे.

जास्त प्रमाणात मसाले असलेले पदार्थ आहारात घेणे टाळावे.

सोडा आणि कोल्ड्रिंक्स शरीरासाठी घातक असतात त्यामुळे पित्त आणि ऍसिडिटी होत असते. त्यामुळे या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

जागरण करणे टाळावे.

अशाप्रकारे पित्त झाल्यावर घरगुती उपाय करून आपण पित्त व ऍसिडिटीचा त्रास कमी करू शकतोत.