Marathi Lagna Patrika Online
लग्न पत्रिका, साखरपुडा निमंत्रण, वाढदिवस आभार पत्र, जागरण गोंधळ पत्रिका ऑनलाईन तयार करणे.
यासंबंधी काही स्टेप खाली दिलेल्या आहेत
स्टेप 1 (Marathi Lagna Patrika Online)
सर्वप्रथम आपण खालील दिलेली वेबसाईट कोणत्याही ब्राउझरमध्ये ओपन करायची आहे.
स्टेप 2 (Marathi Lagna Patrika Online)
वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये डिझाईन तयार करायचे आहे ती कॅटेगरी निवडावी. मी या ठिकाणी लग्नपत्रिका ही कॅटेगरी निवडलेली आहे.
स्टेप 3 (Marathi Lagna Patrika Online)
तुम्ही एकदा का कॅटेगरी निवडली की त्या कॅटेगरी मधील सर्व डिझाईन तुमच्यासमोर दिसतील. त्या दिसणाऱ्या डिझाईन पैकी तुम्हाला जी डिझाईन आवडली आहे त्या डिझाईन वरती क्लिक करावे.
मी समोर आलेल्या डिझाईन पैकी एक डिझाईन निवडलेली आहे.
स्टेप 4 (Marathi Lagna Patrika Online)
डिझाईन निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॅनेज लेयर व टेक्स्ट लेयरअसे दोन ऑप्शन दिसतील.
स्टेप 5 (Marathi Lagna Patrika Online)
टेक्स्ट लेयर मधील क्लिअर या बटणावर क्लिक करून तुम्ही या डेमो मधील दिलेली माहिती डिलीट करू शकतात व त्या ठिकाणी आपणास आवश्यक असणारी माहिती टाईप करू शकतात.
टेक्स्ट लेयर मधील क्लिअर या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिझाईन वरील माहिती क्लिअर झालेली दिसेल आणि तुम्हाला हवी असलेली माहिती त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये भरली कि डिझाईन मध्ये तुम्हाला तुमची भरलेली माहिती दिसेल.
या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त अशी काही बटन आलेली आहेत. त्यामध्ये भरलेली माहिती सेव करणे, undo, redo करणे, झूम करणे, भरलेली माहिती रिसेट करणे अशा पद्धतीचे बटन आहेत.
स्टेप 6 (Marathi Lagna Patrika Online)
तुमची डिझाईन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही add to cart या बटनावर क्लिक करावे.
यानंतर तुम्ही निवडलेले डिझाईन cart मध्ये ऍड झालेली दिसेल.
स्टेप 7 (Marathi Lagna Patrika Online)
नंतर तुम्ही view cart या बटनावर क्लिक करावे.
यानंतर प्रोसिड टू चेक आउट या बटणावर क्लिक करावे.
यानंतर आपली बेसिक माहिती भरून ऑर्डर प्लेस करावी. ऑर्डर प्लेस केल्यानंतर आपण दिलेल्या ई-मेल आयडी वरती आपल्या ऑर्डर ची माहिती आपणास मिळेल. आपणास डिझाईन डाऊनलोड करण्यासाठी ई-मेल ही येईल.
स्टेप 8 (Marathi Lagna Patrika Online)
आपली ऑर्डर प्लेस झाल्यानंतर रिसिव्ह ऑर्डर ची विंडो आपणासमोर ओपन होईल. आपण तयार केलेली डिझाईन डाऊनलोड करण्यासाठी यानंतर आपण डाऊनलोड या बटनावरती क्लिक करावे.
यानंतर आपणांसमोर खालील प्रमाणे विंडो दिसेल.
तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तीन फॉरमॅटमध्ये आपली डिझाईन डाऊनलोड करू शकतात ज्यामध्ये पीडीएफ, पीएनजी आणि जेपीजी फॉरमॅट याठिकाणी उपलब्ध आहेत.
वरीलपैकी तुम्हाला ज्या फॉरमॅटमध्ये आपली डिझाईन आवश्यक आहे त्या फॉरमॅट वर क्लिक केल्यानंतर आपली डिझाईन डाऊनलोड होईल.
स्टेप 9 (Marathi Lagna Patrika Online)
वरील पद्धतीने आपली डिझाईन तयार केल्यानंतर आपण ती सोशल मीडिया द्वारे आपल्या नातेवाईकांना व मित्र परिवारांना डिजिटल पद्धतीने पाठवू शकतात.
सारांश
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपणास निमंत्रण पत्रिका सर्व नातेवाईकापर्यंत किंवा मित्रपरिवारापर्यंत प्रत्यक्ष घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुम्हास आवश्यक असणारी निमंत्रण पत्रिका तयार करून, ती सोशल मीडिया द्वारे आपल्या मित्र परिवारास किंवा नातेवाईकास पाठवू शकतात.
महत्वाची प्रश्नोत्तरे
प्रश्न १:- डिझाईन तयार करण्यासाठी मला काही पैसे लागतील का?
उत्तर:- सध्या तरी या वेबसाईट वरती डिझाईन तयार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
प्रश्न २:- मी किती वेळा डिझाईन तयार करू शकतो?
उत्तर:- यासाठी कोणतेही बंधन नाही तुम्ही किती वेळा तुम्हाला आवश्यक असणारे डिझाईन तयार करू शकतात.
प्रश्न ३:- डिझाईन तयार करण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर:- एक ते दोन मिनिटांमध्ये तुम्ही डिझाईन तयार करू शकतात.
प्रश्न ४ :- डिझाईन तयार करण्यासाठी डिझाईन चे नॉलेज आवश्यक आहे का?
उत्तर:- नाही.
प्रश्न ५ :- मी तयार केलेली डिझाईन ईमेल आयडी वरती मिळेल का?
उत्तर:- होय तुम्ही तयार केलेली डिझाईन तुम्हाला ईमेल द्वारे पाठवली जाईल.