PhonePe ने केले मोफत Phonepe Indus App Store लाँच
आपणास कोणतेही ॲप डाऊनलोड करायचे असेल तर आपण अँड्रॉइड मोबाईल साठी गुगल प्ले स्टोअर आणि ॲप्पलच्या मोबाईल साठी ॲपल स्टोअरचा वापर करत आलो आहेत . play store आणि ॲपल स्टोअर वर कोणतेही ॲप सहज शोधता येते आणि झटपट डाऊनलोड होते म्हणून प्रत्येक जण या दोन ॲपचा सर्वाधिक वापर करतो. आता या दोन्ही परदेशी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी फोनपेने मेड इन इंडिया अंतर्गत ॲप स्टोअर आणले आहे. भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने स्वदेशी Phonepe Indus App Store लाँच केले आहे. भारतात तयार केलेले हे ॲप स्टोअर स्वदेशी आहे. या नवीन ॲप स्टोअरची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Phonepe Indus App Store आहे स्वदेशी
सदर Phonepe Indus App Store हे भारतामध्ये तयार झाले असल्यामुळे ते पूर्णपणे स्वदेशी आहे. फोन पे चे मुख्यालय बंगलोर येथे असून त्या कंपनीने हे indus app store आले आहे. त्यामुळे स्वदेशी असणाऱ्या या स्टोअरला भारतीय लोक पसंती देणार आहेत. भारतीय स्मार्टफोन धारकांची संख्या लक्षात घेऊन हे भारतीय लोकांसाठी खूप महत्त्वाचे ॲप स्टोअर ठरणार आहे. भारतीय ग्राहकांच्या स्थानिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
Phonepe Indus App Store ची घोषणा
शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी या ॲप स्टोअरची घोषणा करण्यात आली. सदर ॲप स्टोअरचे सह संस्थापक श्री. सुनील डोंगरे यांनी या App Store ची घोषणा केली. भारतीय लोकांसाठी साठी हे ॲप स्टोअर खूप महत्त्वाचे आहे. कारण की यामध्ये बारा भारतीय भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मराठी भाषा चा हि समावेश करण्यात आलेला आहे.
लाँच बद्दल बोलताना, आकाश डोंगरे, CPO आणि सह-संस्थापक, Indus Appstore म्हणाले, “भारतात 2026 पर्यंत 1 अब्जाहून अधिक स्मार्टफोन वापरकर्ते असतील आणि आम्हाला नवीन काळातील, स्थानिकीकृत Android ॲप स्टोअर तयार करण्याची मोठी संधी उपलब्ध होईल.
(pic credit indusappstore.com)
या ॲप स्टोअरची अधिकृत वेबसाईट
व्हिडिओ एलईडी ॲप डिस्कवरी
सदर स्टोअर वरती शॉर्ट व्हिडिओ द्वारे आपणास विविध ॲप ची याची माहिती मिळणार आहे.त्यामुळे डेव्हलपर्स ही अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतात. आपण व्हाट्सअप तसेच इंस्टाग्राम वर पाहत असलेल्या स्टेटस प्रमाणे प्रत्येक ॲपचे आपणास शॉट व्हिडिओज आपणास दिसणार आहेत. या नवीन स्टेटस या प्रणालीचा उपयोग करून फोन पे अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
Phonepe Indus App Store चा डेव्हलपर्ससाठी सपोर्ट
Phonepe Indus App Store वर वेगळे काय आहे
- मोबाइल नंबर आधारित लॉगिन जे मार्केटमध्ये अत्यंत उपयुक्त आहे जेथे अनेक ग्राहकांचे ईमेल खाते देखील नाही
- ॲप -मधील पेमेंटसाठी शून्य कमिशन
- पहिल्या वर्षासाठी शून्य शुल्क
- भारत-आधारित सपोर्ट टीम ईमेल किंवा चॅट बॉटद्वारे उपलब्ध आहे.
- तसेच डेव्हलपरच्या प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी समर्पित खाते व्यवस्थापक.
- कोहॉर्ट-आधारित लक्ष्यित रीलिझ व्यवस्थापन जे विकसकांना नवीन ॲप आवृत्त्या संबंधित वापरकर्त्यांच्या गटासाठी रोल आउट करण्यास अनुमती देईल
- नवीन आवृत्ती लॉन्च करताना AI-चालित रीअल-टाइम अॅप व्हिटल्सचे निरीक्षण
- रिअल-टाइम विश्लेषणे, उद्योग ट्रेंडवरील सखोल अंतर्दृष्टी आणि विकासकांना सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यात मदत करण्यासाठी स्पर्धक विश्लेषण
- हुशार आणि जलद ॲप अद्यतने जे वापरकर्त्यांना नवीनतम आवृत्तीमध्ये अधिक जलद अद्यतनित करण्यास अनुमती देतात.